आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inspiring: दलिताशी लग्न केले म्हणून बापाने मूल होण्यापासून रोखले; प्रेग्नंट होताच पतीचा झाला मर्डर, पण हरली नाही हिंमत... आता दिला मुलाला जन्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तेलंगणच्या )Telangana) नालगोंडामध्ये 5 महिन्यांपूर्वी झालेल्या ऑनर किलिंगमुळे (Honor Killing) देशभरात खळबळ उडाली होती. तेव्हा 23 वर्षीय तरुण प्रणयची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली होती, कारण त्याने सवर्ण जातीतील अमृताशी लग्न केले होते. तरुणीच्या वडिलांना आपली मुलगी दलित तरुणाच्या मुलाची आई बनू नये असे वाटत होते. अमृताला असे करण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी तिचा गर्भपात करण्याचीही धमकी दिली होती, परंतु अमृताने त्याची पर्वा केली नाही. ती जेव्हा 4 महिन्यांची गर्भवती होती, तेव्हा तिच्या वडिलांनीच प्रणयची सुपारी देऊन अतिशय निर्घृण हत्या घडवून आणली होती. तिच्या सासरच्या मंडळींनाही धमक्या मिळाल्या होत्या. यानंतरही अमृताने हिंमत सोडली नाही, बाळाला जन्म देण्यावर ठाम राहिली.

 

4 दिवसांपूर्वीच 30 जानेवारी रोजी तिने बाळाला जन्म देऊन आपल्या संघर्षाला सुरू ठेवले आहे. या घटनेला सोशल मीडियावर जातिवादावर विजयाचे उदाहरण म्हणून सादर केले जात आहे. हॅशटॅग# इस तस्वीर को देखकर मुस्कराइए... व्हायरल होत आहे. दैनिक भास्करने हैदराबादच्या रुग्णालयात दाखल अमृताशी ऑनर किलिंगवर संपर्क साधला. अमृताने सांगितले, 'माझे आता दोनच उद्देश आहेत. मुलाचे चांगले पालनपोषण आणि प्रणयला न्याय मिळवून देणे.' त्या म्हणाल्या की, मी मुलाला फक्त आणि फक्त भारतीय बनण्यासाठीच सांगेन, जो जाती, धर्माबद्दल बोलणार नाही. शोषितांची मदत करेन आणि अन्यायाविरुद्ध लढेन. अमृताला जेव्हा विचारण्यात आले की, मुलाला कसे सांगाल की, तुझ्या वडिलांना कोणी मारले? यावर अमृताने उत्तर दिले की, समाजात जाती, क्षेत्र, धर्माच्या आधारो विष पसरवणारेच असे करतात. अमृताने असेही म्हटले की, 'अजूनही मला आणि माझ्या मुलाला माहेरच्यांकडून धोका आहे.' दुसरीकडे, प्रणयचे वडील बालस्वामी म्हणाले, 'मला किंवा माझ्या कुटुंबीयांना काहीही होवो, आरोपींना शिक्षा होईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.'


माहेरच्यांना नको होते की, अमृता एका दलिताच्या मुलाची आई व्हावी...
दोन वर्षांपूर्वी दलित प्रणयने सवर्ण अमृताशी तेलंगणमध्ये लग्न केले होते. या लग्नामुळे अमृताचे कुटुंबीय नाराज होते. तथापि, काही काळानंतर तेही तयार झाले, परंतु त्यांनी अट ठेवली की, प्रणयच्या बाळाला अमृताने जन्म देऊ नये. जर असे झाले तर अमृताच्या बाळावर दलित असण्याचा टॅग लागेल. या धमकीला भीक न घालता अमृता आपले कुटुंब वाढवण्यासाठी प्रेग्नंट झाली. हा निर्णय अमृताच्या माहेरच्यांना रुचला नाही आणि त्यांनी प्रणयची हत्या घडवून आणली. सप्टेंबरमध्ये घडलेले हे हत्याकांडा देशपातळीवर चर्चिले गेले होते. तथापि, अद्यापही या प्रकरणाचा तपास सुरूच आहे.


 

 

बातम्या आणखी आहेत...