आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Telangana Is Being Built On The Lines Of Tirupati, Rs.1200 Crores 'city Of The Temple'

तिरुपतीच्या धर्तीवर तेलंगणात तयार होत आहे Rs..1200 कोटींचे 'मंदिराचे शहर'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यादाद्रिगुट्टा (हैदराबाद) - तेलंगणला याआधीच तयार असलेली हैदराबाद ही राजधानी मिळाली आहे, पण तिरुपतीसारखे धार्मिक पर्यटनाचे मोठे केंद्र आंध्र प्रदेशमध्ये गेले. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे तिरुपतीच्या स्पर्धेत उतरू शकेल असे 'मंदिराचे शहर' (टेम्पल सिटी) तयार करत आहेत. हैदराबादपासून ७० किमी दूर यादाद्रिगुट्टामध्ये नऊशे वर्षे जुन्या लक्ष्मी-नरसिंहस्वामी मंदिराला भव्य रूप दिले जात आहे.

 

तीन वर्षांपासून पाचशे कारागीर ते तयार करत आहेत. दोन हजार एकर जमीन घेण्यात आली असून १२०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. मंदिराचे काम या वर्षी पूर्ण होणार आहे. मात्र 'टेम्पल सिटी' तयार होण्यास वेळ लागेल.

बातम्या आणखी आहेत...