आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणा : रुग्णालयात टिकटॉकवर बनवला व्हिडिओ; २ निवासी डाॅक्टर निलंबित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - तेलंगणातील हैदराबादच्या सरकारी गांधी रुग्णालयात टिकटॉकवर व्हिडिओ तयार केल्याने दोन निवासी डॉक्टरांना निलंबित करण्यात आले. फिजिओथेरपी विभागाच्या डाॅक्टरांनी रुग्णालयात व्हिडिओ चित्रीकरण केले होते. रुग्णालय प्रशासनाने त्यांना बेजबाबदारपणाचे वर्तन केल्यावरून निलंबित केले आहे. इतकेच नव्हे, तर फिजिओथेरपी विभागाच्या प्रमुखांना नोटीस बजावली आहे. विभागानेही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, हे दोन्ही डॉक्टर गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे नसल्याचे सांगितले. ते आमच्याकडे इंटर्नशिप करत होते. 

 

महिला पोलिसांच्या निलंबनानंतर गुजरातमध्येही कारवाई

गांधीनगर - गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील लांघनज पोलिस ठाण्यात टिकटॉकवर व्हिडिओ तयार केल्यानंतर एका महिला पोलिसास निलंबित केले होते. यानंतर राज्यभरात आणखी काही पोलिसांनी टिकटॉकवर व्हिडिओ तयार केल्याची प्रकरणे आढळून आली आहेत. यामध्ये काही प्रमुख अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पोलिस महासंचालक शिवानंद झा यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे. राज्याचे गृह राज्यमंत्री दीपक जडेजा यांच्याशी चर्चा केली. प्रशासन यावर लवकरच कारवाईचे आदेश जारी करू शकते.