आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरटेलने पहिल्यांदा लॉन्च केली वाय-फाय कॉलिंग सर्व्हिस; उत्तम इनडोर सिग्नल क्वॉलिटी मिळेल : कंपनीचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यातील एक असलेल्या भारती एअरटेलने मंगळवारी आपली वाय-फाय कॉलिंग सर्व्हिस लॉन्च केली. या सर्व्हिसद्वारे एअरटेलच्या ग्राहकांना ऑफिस तसेच घरात उत्तम सिग्नल क्वॉलिटी देणार असल्याचा कंपनीने दावा केला आहे. सध्या तरी ही सुविधा दिल्ली-एनसीआरमध्ये उपलब्ध आहे. मात्र लवकरच देशातील इतर भागात ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. 

एअरटेल वाय-फाय कॉलिंगसाठी कोणत्याही अॅपची आवश्यकता नाही. मात्र चार स्टेप्समध्ये आपल्या फोनमध्ये कॉन्फिगर करता येते. 

  • 1. स्मार्टफोनच्या कॉम्पॅटिबिलिटी ला airtel.in/wifi-calling वर व्हॅरिफाय करा.
  • 2. डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सॉफ्टवेअरला लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपग्रेड करा, जे वाय-फाय कॉलिंग फीचरला सपोर्ट करेल.
  • 3. स्मार्टफोनच्या सेटिंग्समध्ये जा आणि वाय-फाय कॉलिंग ऑन करा.
  • 4. उत्तम सर्व्हिससाठी वोल्टेला ऑन राहू द्या.

सध्या निवडक स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असेल ही सेवा

  • अॅपल : 6S किंवा त्यावरील सीरीजचे सर्व आयफोन
  • श्याओमी : रेडमी K20, रेडमी K20 प्रो तसेच पोको एफ1
  • सॅमसंग : J6, A10S, ऑन 6, M30s
  • वनप्लस : वनप्लस 7 सीरीज सर्व मॉडल

कंपनी इतर स्मार्टफोनमध्ये एअरटेल वाय-फाय कॉलिंग सर्व्हिस देण्यावर काम करत आहे. ही सर्व्हिस एअरटेल एक्सट्रीम फायबर होम ब्रॉडबँडशी कॉम्पॅटिबल आहे, लवकरच सर्व ब्रॉडबँड सर्व्हिससह वाय-फाय हॉटस्पॉटसोबत सुद्धा वापरता येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...