आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागॅजेट डेस्क - भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ने भारत फायबर ब्रॉडबँड प्लान लॉन्च केले आहे. 2 हजार रुपये किमतीच्या या प्लॅनमध्ये कंपनी 1.5TB डेटा देणार आहे. मात्र या प्लानला सध्या ठराविक सर्कलमध्ये लॉन्च केले आहे. कंपनीने सर्वात अगोदर तेलंगणा आणि चेन्नई सर्कलमध्ये हा प्लान लॉन्च केला आहे. प्रमोशनल बेसिसवर याची वैधता 90 दिवसांचा राहणार आहे.
प्लॅनमध्ये काय मिळणार
या प्लॅनमध्ये युजरला 1500GB अर्थात तब्बल 1.5TB डेटा मिळेल. याची स्पीट 200Mbps असेल. डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 2Mbps करण्यात येणार आहे. परंतु या 2Mbps स्पीडवर अपलोड आणि डाउनलोड अमर्याद करता येणार आहे. तर या प्लानची वैधता 90 दिवसांची असणार आहे. या प्लॅनमध्ये देशातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. युजर या प्लानला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून घेऊ शकता. प्लान सब्सक्राइब करण्यासाठी 6 एप्रिल 2020 ही शेवटीच तारीख आहे.
या सुविधा देखील मिळणार
> बीएसएनएल या फायबर प्लानसोबत 999 रुपये किमतीचे अॅमेझॉन प्राइमचे सबस्क्रिप्शनदेखील फ्री देत आहे. दरम्यान, या प्लानचे काय फायदे असतील याबाबत कंपनीने पूर्ण माहिती दिली नाही.
> बीएसएनएलच्या या प्लानमुळे जिओ फायबरच्या 2,499 रुपयाच्या ब्रॉडबँड प्लानला टक्कर मिळू शकते. जिओच्या या प्लॅनमध्ये 500Mbps स्पीडसोबत 1.2TB अर्थात 1200GB डेटा देत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.