आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Telecom : Finance Minister Nirmala Sitharaman On Telecom Sector Company Bharti Airtel, Vodafone Idea India

कोणतीही कंपनी बंद होऊ नये, सरकार त्यांच्या अडचणी सोडवू इच्छित आहे - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशभरात टेलिकॉम कंपन्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अनेक कंपन्यांवर कोट्यवधी रुपयांचा कर्जाचा डोंगर आहे. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी सांगितले की, सरकार संकटातून जाणाऱ्या दूरसंचार कंपन्यांच्या चिंता दूर करू इच्छित आहे. कोणत्याही कंपनीने आपले काम थांबवू नये. सर्व कंपन्यांनी मनोबल उच्च ठेवून व्यवसाय चालू ठेवावा अशी माझी इच्छा असल्याचे सीतारमण म्हणाल्या. 

 

एजीआरच्या देयकामध्ये दूरसंचार कंपन्यांना हवा दिलासा  


सीतारमण म्हणाल्या की, अर्थव्यवस्थेत व्यावसायिक कंपन्यांची संख्या जास्तीत जास्त असावी, त्यांचा व्यवसाय यशस्वी व्हावा. दूरसंचारच नाही तर सर्वच क्षेत्रातील कंपन्यांसाठी मी हीच प्रार्थना करत आहे. अर्थमंत्रालय याच दृष्टीकोनातून सर्वांसोबत संवाद साधत आहे. दूरसंचार क्षेत्रानेही संपर्क साधला. आम्ही त्यांच्या समस्या जाणून आहोत. 

 

व्होडाफोन-आयडिया ला झाला 51 हजार कोटींचा तोटा


अॅडजस्ट ग्रॉस रेव्हेन्यू (एजीआर) वर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर टेलीकॉम कंपन्यांवर 1.42 लाख कोटी रुपयांचे देय बनत आहे. टेलिकम्युनिकेशन विभागाला त्याच्या देयकासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत अनेक बड्या कंपन्यांना विक्रमी तोटा झाला. व्होडाफोन-आयडिया (व्हीआयएल)ने 50 हजार 921 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले. भारतीय कंपनीचा हा तिमाहीतील सर्वात मोठा तोटा आहे. व्हीआयएलने गुरुवारी परिणाम जाहीर करत सांगितले की, आता व्यवसाय सुरू ठेवण्याची क्षमता सरकारकडून मिळालेल्या सवलतीवर अवलंबून आहे. 

सरकार कंपन्यांच्या अडचणींकडे लक्ष देणार


भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने एजीआरच्या मुद्द्यावर दिलासा देण्याची सरकारकडे मागणी केली आहे. या कंपन्यांना कमीत कमी व्याज आणि दंडात दिलासा मिळावा अशी आशा आहे. याबाबत सीतारमण यांचे म्हणणे आहे की, एजीआरवर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ज्या कंपन्यांनी गंभीर चिंतेविषयी सांगितले, आम्ही त्या त्याकडे लक्ष देणार आहोत.

 

बातम्या आणखी आहेत...