आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1 डिसेंबरपासून व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलचे डेटा आणि कॉल दर वाढवणार; वाढत्या किंमत आणि चांगल्या सेवेचे सांगितले कारण 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल 1 डिसेंबर पासून मोबाइल टॅरिफमध्ये वाढ करणार आहेत. सोमवारी व्होडाफोन-आयडियाने सांगितले की, "ग्राहकांना जागतिक डिजीटल अनुभव देण्यासाठी कंपनी आपल्या टॅरिफमध्ये वाढ करणार आहे. ही वाढ एक डिसेंबरपासून लागू करण्यात येईल." तर दूसरीकडे एअरटेलने सांगितले की, ग्राहकांना किफायतशीर दर उपलब्ध करून देणे आमची प्राथमिकताआ आहे. मात्र आर्थिक गरजांसह संतुलन असणे आवश्यक आहे. जेणे करून डिजीटल इंफ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक सुरु ठेवता येईल. अशा प्रकारे ग्राहकांना सेवेची गुणवत्ता अधिक चांगली मिळेल.


आयडिया-व्होडाफोनने दावा की, संपूर्ण जगात भारतात मोबाइल डेटा सर्वात स्वस्त आहे. आणि बाजारात याची मागणी कायम आहे. कंपनी सध्या एका महिन्यासाठी डेटाशिवाय 24 रुपयांत मोबाइल सेवा प्रदान करते. तर डेटासह कमीत कमी 33 रुपये शुल्क द्यावे लागते. कंपनीने सांगितले की, मार्च 2020 पर्यंत देशभरात 4जी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नेटवर्क कव्हरेज आणि क्षमता वाढवली जात आहे. यासह त्यांच्याकडे देशातील सर्वात मोठे स्पेक्ट्रम क्षेत्र असून नेटवर्क एकत्रिकरणाद्वारे संपूर्ण संसाधने वापरली जात आहेत, असेही कंपनीचे म्हणणे आहे.व्होडाफोनला मागील तिमाहीत मोठा तोटा झाला होता


व्होडाफोनने मागील महिन्यात 50,921 रुपयांचा तोटा घोषित केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या समायोजित एकूण महसूल आदेशानंतर सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत हे कोणत्याही व्यवसायातील सर्वात मोठे नुकसान होते. सुप्रीम कोर्टाने मागील महिन्यात सरकारच्या बाजूने निर्णय देत व्होडाफोन-आयडियासह सर्व टेलिकॉम कंपन्यांना दूरसंचार विभागाची थकबाकी देण्याचे निर्देश दिले होते. 

देशात मोबाइल डेटा आणि कॉल दरात घसरण 


टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय)च्या मते, जून 2016 ते डिसेंबर 2017 दरम्यान देशात मोबाइल डेटाच्या रकमेत 95%  घसरण नोंदवण्यात आली. आता मोबाइल डेटा 11.78 रुपये प्रती गीगाबाइट (जीबी) मध्ये उपलब्ध आहे. मोबाइल कॉल दर देखील 60% कमी होऊन 19 पैसे प्रति मिनीट झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...