मुंबई- आंध्र प्रदेशातील विरोधी पक्ष असलेल्या तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत येऊन मातोश्रीवर भेट घेतली. दोघांमध्ये आंध्र प्रदेश विभाजनावरुन चर्चा झाली त्यात शिवसेनेने काँग्रेसचा डाव हाणून पाडण्याचे आश्वासन नायडू यांना दिले आहे.
आंध्र प्रदेशच्या विभाजनाचा मसुदा आंध्र प्रदेश विधानसभेने फेटाळून लावल्यानंतरही केंद्रातील काँग्रेस सरकार स्वतंत्र तेलंगणा राज्य बनविण्यावर ठाम आहे. त्यातच आजपासून दिल्लीत लोकसभेचे अखेरचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. तसेच या अधिवेशनात स्वतंत्र तेलंगणावर यूपीए सरकार अखेरची मोहोर लावणार आहे. मात्र तेथील स्थानिक पक्ष असलेला तेलगू देसमचा त्याला कडाडून विरोध असून, सरकारने संसदेत आंध्रच्या विभाजनाचा मसुदा मांडल्यानंतर देशातील विविध पक्षांनी त्याला विरोध करावा, यासाठी चंद्राबाबू वेगवेगळ्या पक्षप्रमुखांची भेट घेत आहेत. त्याताच भाग म्हणून ते आज मुंबईत दाखल झाले व त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी अखंड आंध्रला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. तसेच या चर्चेनंतर चंद्राबाबू आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईत एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेने आपली भूमिका मांडली