Home | Sports | From The Field | telivision rating down on ipl

प्रेक्षकांची संख्या घटल्याने आयपीएलची झिंग उतरली?

विनायक दळवी | Update - May 29, 2011, 02:20 AM IST

'आयपीएलची' झिंग बऱ्यापैकी उतरली आहे, असे गेल्या ४५ दिवसांत प्रेक्षकांच्या संख्येत झालेली घट, सामन्यातून झालेले उत्पन्न आणि ढासळलेल्या टीआरपीवरून दिसून आले आहे.

 • telivision rating down on ipl

  ipl_258मुंबई - 'आयपीएलची' झिंग बऱ्यापैकी उतरली आहे, असे गेल्या ४५ दिवसांत प्रेक्षकांच्या संख्येत झालेली घट, सामन्यातून झालेले उत्पन्न आणि ढासळलेल्या टीआरपीवरून दिसून आले आहे.

  'टॅम' स्पोटर्स मीडिया रिसर्च या संस्थेने आयपीएल चारच्या टेलिव्हिजन प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा निष्कर्ष जाहीर केला आहे. भारतात झालेल्या क्रिकेटकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी २८ (आयपीएल १) मध्ये व २१ मध्ये प्रेक्षकांनी या स्पर्धेला भरघोस पाठिंबा दर्शविला होता. 'टॅम'च्या टीआरपी पाहणीच्या निष्कर्षानुसार २८ चा टीआरपी ५.३९ होता. २१ चा टीआरपी ५.५ होता. २११ च्या आयपीएल चारचा टीआरपी आहे अवघा ३.८. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेचे टेलिव्हिजन रेटिंग कमी झाले होते, परंतु नंतरच्या वर्षी (२१) भारतात झालेल्या स्पर्धेत हे रेटिंग पुन्हा वाढले होते. त्या अनुभवानुसार आयपीएल-४ ला प्रेक्षक पाठिंबा देतील, अशी क्रिकेट बोर्डाची अपेक्षा होती. ती फोल ठरली आहे.

  प्रेक्षकांनी टेलिव्हिजन सेटपर्यंत पोहोचूनही या स्पर्धेकडे पाठ फिरवली, असे 'टॅम'चा ६८ सामन्यांनंतरचा अहवाल सांगतो. टेलिव्हिजन रेटिंग घटल्यामुळे आपोआपच त्याचा परिणाम जाहिरातींच्या ओघावरही झाला आहे.

  ललित मोदीं यांची हकालपट्टी, विविध राज्य सरकारांनी आयपीएल तिकिटांवर लावलेला करमणूक कर, आयपीएल तिस:या स्पर्धेनंतर संघातील खेळाडूंची झालेली अदलाबदलही प्रेक्षकांना रुचली नाही. त्याशिवाय क्रिकेट विश्वचषक भारताने ङ्क्षजकल्यामुळे क्रिकेट रसिकांच्या उत्साहाची परिसीमा त्या वेळीच अत्युच्च टोकाला जाऊन पोहोचली होती. विश्वचषक जिंकल्यानंतर अवघ्या ६ दिवसांनी सुरू झालेल्या आयपीएल-४ ला म्हणूनच प्रेक्षकांनी स्वीकारले नाही. तसेच विश्वचषकानंतर सट्टेबाज, जुगारीही थंडावले होते.

  अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळेही त्यानंतर प्रसिद्धीचा झोत क्रिकेटवरून दूर गेला आणि उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारेंवर पडला. तीन वर्षांपूर्वी सापडलेली आयपीएल नावाची अलिबाबाची गुहा आता बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.Trending