Home | Maharashtra | Pune | tell accurate result of election and won the 21 lack rupees price

निवडणूक निकालाचे अचुक भविष्य सांगा आणि २१ लाखांचे बक्षीस जिंका; या संघटनेने भविष्यकारांना दिले आव्हान

प्रतिनिधी | Update - Apr 13, 2019, 11:11 AM IST

प्रवेशिका, प्रश्नावली आणि नियमावलीसाठी डाॅ.नितीन शिंदे यांच्याशी या ९८६०४३८२०८ क्रमांकावर संपर्क साधावा

  • tell accurate result of election and won the 21 lack rupees price

    पुणे - देशात आणि महाराष्ट्रात हाेणाऱ्या विविध स्तरांवरील निवडणूक निकालांचे भाकीत भविष्यकार प्रत्येक निवडणुकीवेळी वर्तवत असतात. त्यांचे हे भविष्य प्रसारमाध्यमांद्वारे लाेकांसमाेर येते व लाेकांत गैरसमज पसरतात. त्यामुळे अंधश्रध्दा निर्माण होते. फसवणुक करणाऱ्या अशा वृत्तींविराेधात महाराष्ट्र अंनिसने देशातील सर्वच ज्याेतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा आणि २१ लाखांचे बक्षीस जिंका, असे आव्हान दिले आहे. त्यासाठीची आव्हान प्रक्रिया व प्रश्नावली महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व खगाेल अभ्यासक डाॅ.नितीन शिंदे यांनी जाहीर केली आहे.

    पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले आहे की, लाेकांच्या अज्ञानाचा फायदा उठवून चमत्कार करणाऱ्या व फलज्याेतिष सांगणाऱ्या बुवाबाबांनी केलेल्या फसवणुकीविराेधात महाराष्ट्र अंनिस गेली अनेक वर्षे सातत्याने रचनात्मक संघर्ष करत आहे. चमत्कार आणि फलज्याेतिष यांच्यातील फाेलपणा अंनिसने आपल्या शास्त्रीय मांडणीतून सिध्द केला आहे. बुवाबाजीच्या माध्यमातून लाेकांचा अज्ञानाचा फायदा घेऊन समाजाचे आर्थिक, सामाजिक, लेंगिक शाेषण हाेऊ नये यासाठी संघटनेने चमत्कार आणि फलज्याेतिषाची वारंवार शास्त्रीय चिकित्सा केली आहे. त्याद्वारे फलज्याेतिषातील अवैज्ञानिक बाजू समाजासमाेर यावी असा प्रयत्न राहिलेला आहे. प्रवेशिका, प्रश्नावली आणि नियमावलीसाठी डाॅ.नितीन शिंदे यांच्याशी या ९८६०४३८२०८ क्रमांकावर संपर्क साधावा.

Trending