आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Telling A Lie Sometimes For Benefit Of Someone Is Not Wroing

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भल्यासाठी खोटे बोला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका शेतक-याच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्याच्या घरात अन्नाचा एक दाणाही शिल्लक राहिला नव्हता. गावात कुणीही शेतक-याची मदत करण्यासारखे नव्हते. काय करावे म्हणून शेतकरी विचार करीत राहिला. काहीच उपाय सुचला नाही तेव्हा शेतक-याने एका सावकाराची गाय चोरली. सकाळी त्या गायीचे दूध आपल्या मुलांना पाजले. सावकाराच्या नोकरांना माहीत झाल्यावर त्यांनी शेतक-याने गाय चोरल्याची तक्रार केली. सावकाराने पंचायतीमध्ये शेतक-याला बोलावले. पंचांनी शेतक-याला विचारले, ही गाय तू कुठून आणली आहेस? शेतकरी म्हणाला, ही गाय मी खरेदी केली आहे. पंचांनी फारच कसून चौकशी केली, मात्र शेतकरी या उत्तरावर ठाम राहिला. त्यानंतर पंचांनी सावकाराला विचारले, ही गाय आपली आहे का? सावकाराने शेतक-याकडे पाहिले तेव्हा शेतक-याने आपली नजर खाली झुकवली. तेव्हा सावकाराने म्हटले, पंचहो, माझ्याकडून चूक झाली. ही गाय माझी नाही. पंचांनी शेतक-याला दोषमुक्त केले. घरी पोहोचल्यानंतर सावकाराच्या नोकरांनी खोटे बोलण्याचे कारण विचारले. सावकार म्हणाला, त्या शेतक-याच्या नजरेत मला दु:ख दिसत होते. मी त्याची विवशता समजलो. मी खरे बोललो असतो तर पंचांनी त्याला शिक्षा केली असती. त्यामुळे मी खोटे बोलून एका कुटुंबाला जास्त संकटात लोटण्यापेक्षा वाचवले. तात्पर्य, एखाद्याच्या भल्यासाठी खोटे बोलणे पूर्णपणे धार्मिक असते. कारण संकटग्रस्ताच्या मदतीसाठी साधनाचे पावित्र्य नाही तर साध्याची सात्त्विकता पाहिली जाते.