Home | News | Telugu actress Shri Reddy made the accusation of harassment against actor vishal via post on Facebook

तेलगु अभिनेत्री श्री रेड्‌डीने फेसबुकवर केलेल्या पोस्टद्वारे अभिनेता विशालवर केला हरॅसमेंटचा आरोप   

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 18, 2019, 10:36 AM IST

'तुला मला बरबाद करायचे असेल तर मी तयार आहे' - श्री रेड्डी 

 • Telugu actress Shri Reddy made the accusation of harassment against actor vishal via post on Facebook

  बॉलिवूड डेस्क : तेलगु अभिनेत्री श्री रेड्‌डीने फेसबुक पोस्ट करून 'राउडी नंबर वन' चित्रपटाचा अभिनेता विशालवर आरोप केला आहे. पोस्टमध्ये रेड्‌डीने लिहिले आहे, 'विना सेक्सुअल कमिटमेंट तो काम करणार नाही, जी महिला कमिटमेंट करेल, तिला चांगले करियर मिळेल आणि तो प्रत्येक मंचावर तिची प्रशंसा करेल.'

  लिहिली आणखी एक पोस्ट...
  दुसरीकडे फेसबुक पोस्टमध्ये श्रीने लिहिले, 'जर तुला माझे करियर बरबाद करायचे असेल तर मी तयार आहे, तू मला मारून टाकशील तरी मी तयार आहे. पण तरीही मी म्हणेन की, तू एक दगाबाज आहेस.' हे सर्व श्री रेड्‌डीने फेसबुक अकाउंटवर केलेल्या एका पोस्टने सुरु झाले. तिने लिहिले, 'विशाल एक दगाबाज आहे, मी माझी आई नि माझ्या कामाची शपथ घेऊन सांगते."

  श्री हेदेखील म्हणाली...
  याव्यतिरिक्त श्री रेड्‌डीने आरोप केला की, विशाल चित्रपटात रोल मिळवून देण्याच्या बदल्यात महिलांसोबत शारीरिक संबंध बनवतो. श्री म्हणाली, "मला माहित आहे की, तू महिलांसोबत शारीरिक संबंध बनवण्यासाठी पैसेही देतोस आणि त्या वयातीलदेखील ओळखते जो तुझ्यापर्यंत महिलांना पोहोचवतो."

  तेलगु अभिनेत्री श्री रेड्‌डी तेव्हा चर्चेत आली होती जेव्हा तिने न्यूड होऊन भर रस्त्यात विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. तिचा हा विरोध मुव्ही आर्टिस्ट ऐसोसिएशनविरुद्ध होता, ज्यामधून तिचे सदस्यत्व संपवले गेले होते.

Trending