आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना मोठा धक्का, तेलुगू देसम पार्टीच्या 4 खासदारांनी केला भारतीय जनता पक्षात प्रेवश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तेलुगू देसम पार्टीने आंध्रप्रदेशातली सत्ता गमावल्यानंतर पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या राज्यसभेतील चार खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. राज्यसभेत टीडीपीचे सहा खासदार होते, त्यापैकी चार जणांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. चंद्राबाबूंनी एनडीएसोबतची युती तोडल्यानंतर भाजपविरोधात मोर्चा उघडला होता. पण विधानसभा आणि लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर खासदारांनीही साथ सोडली आहे.

 

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत तीन खासदारांनी अधिकृतपणे प्रवेश केला, तर एका खासदाराची प्रकृती खराब असल्यामुळे पत्रकार परिषदेला उपस्थित राहता आले नाही. भाजपात प्रवेश करणाऱ्या खासदारांमध्ये टीडी व्यंकटेश, सीएम रमेश, वायएस चौधरी आणि जीएम राव यांचा समावेश आहे.

 

या खासदारांची मागील अनेक दिवसांपासून भाजपात येण्याची इच्छा होती, असे जेपी नड्डा म्हणाले. गुरुवारी या खासदारांनी भाजपाध्यक्ष अमित शाहांना पत्र लिहून विलिनीकरण करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर खासदारांनी भाजपचे पत्र घेऊन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. त्यामुळे हे चारही खासदार आता भाजपचे सदस्य आहेत. या चार खासदारांमुळे आंध्र प्रदेशात भाजपचा जनाधार वाढेल, असे जेपी नड्डा म्हणाले.

 

दरम्यान, हे अशी संकटे आमच्या पक्षासाठी नवीन नसल्याचे चंद्राबाबूंनी म्हटले आहे. आम्ही भाजपसोबत विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी लढा दिला. याचसाठी आमच्या खासदारांनी केंद्रातले मंत्रिपदही सोडले. भाजपने आमचा पक्ष कमकुवत करण्याचा जो प्रयत्न चालवलाय, त्याचा आम्ही निषेध करतो. संकट आपल्या पक्षासाठी नवीन नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये, असेही ते म्हणाले.