आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलगु चित्रपटसृष्टीतील अभिनेता अमित पुरोहितचे निधन, कळू शकले नाही मृत्यूचे कारण 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : तेलगु चित्रपटातील अभिनेता अमित पुरोहितचे निधन झाले आहे. अमितच्या मृत्यूची बातमी महेश बाबूचा भाऊ सुधीर बाबूने आपल्या ट्विटरवरून दिली आहे. अमितच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही पण हे सांगितले जात आहे की, त्याला हार्ट अटॅक आलं होता. अमितला त्याचे चित्रपट 'आलाप', 'सम्मोहनम' आणि 'पंख' साठी ओळखले जाते. 

 

सेलेब्सने व्यक्त केले दुःख... 
अमितच्या मृत्यूची माहिती देत सुधीर बाबूने लिहिले, 'अमित पुरोहितच्या मृत्यूच्या बातमीने खूप दुखी आहे. त्याने 'सम्मोहनम' मध्ये अमित मल्होत्राची भूमिका साकारली होती. खूपच मनमिळाऊ मुलगा आणि नेहमी प्रत्येक शॉटसाठी 100% देत होते. आणखी एक चांगला अभिनेता आपल्याला खूप लवकर सोडून गेला. त्याच्या आत्म्याला शांती मिळो.' 

 

 

अदिती राव हैदरीनेदेखील ट्वीट करिन आपला को-स्टार असलेल्या अमितला श्रद्धांजली दिली. अदितीने लिहिले, 'अमित तुझ्या आत्म्याला शांती मिळो. देव कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. एक दयाळू, विनम्र आणि मेहनती व्यक्ती खूप लवकर चालल्या गेला. चित्रपट 'सम्मोहनम' मध्ये तुझ्या मत्त्वपूर्ण उपस्थितीसाठी धन्यवाद.'  

बातम्या आणखी आहेत...