आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Telugu Superstar Alu Arjun Bought Luxury Vanity Van, Shared A Photo And Said To The Fans Thank You

तेलगु सुपरस्टार अलू अर्जुनने खरेदी केली लग्झरी व्हॅनिटी व्हॅन, फोटो शेअर करून फॅन्सला म्हणाला - धन्यवाद 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : तेलगु चित्रपटाचा सुपरस्टार अलु अर्जुनने ट्विटरवर आपल्या नव्या व्हॅनिटी व्हॅनचा फोटो शेअर केला. यासोबत त्याने लिहिले आहे, "जेव्हाही मी आयुष्यात काही नवीन खरेदी करतो तर माझ्या डोक्यात एकच गोष्ट असते की, लोक माझ्यावर खूप प्रेम करते. ही त्यांच्याच प्रेमाची ताकत आहे की, मी व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली. नेहमी आभारी आहे. सर्वांचे धन्यवाद. ही माझी व्हॅनिटी व्हॅन FOLCON आहे." 

 

7 कोटी रुपये आहे किंमत... 
रिपोर्ट्सनुसार, या व्हॅनिटी व्हॅनची किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे. रेड्डी कस्टम्सद्वारे याला स्पेशली मॉडिफाय केले गेले. यामध्ये लग्झरी केविन सोबत अलू अर्जुनच्या नावाचा लोगो AA देखील लावला गेला आहे. मास्टर केविनमध्ये एक रिक्लायनर आहे, ज्याचा वापर अलू मीटिंग्ससोबत टीव्ही पाहण्यासाठीही करू शकतो. याव्यतिरिक्त आराम करण्यासाठी आणि फ्रेश होण्यासाठीदेखील लग्झरी सुविधा व्हॅनमध्ये उपलब्ध आहेत. सांगितले जाते आहे की, रेड्डी कस्टम्सला याला तयार करायला सुमारे 5 महिन्यांचा वेळ लागला. केवळ याच्या इंटेरियरवर सुमारे 3.5 कोटी रुपये खर्च झाले आहेत.  

 

2 वर्षांच्या वयापासून करत आहे चित्रपटात काम... 
अलू तेव्हापासून चित्रपटात काम करत आहे, जेव्हा तो केवळ दोन वर्षांचा होता. 1985 मध्ये त्याचा पहिला तेलगु चित्रपट विजेता आला होता, ज्यामध्ये तो एक चाइल्ड आर्टिस्ट दाखवला गेला होता. मात्र, लीड अभिनेता म्हणून तो पहिल्यांदा गंगोत्री (2003) मध्ये दिसला होता. त्याने आतापर्यंत 'आर्य' (2004), 'आर्य 2' (2009), 'येवडू' (2014) आणि 'ना पेरू सूर्या', 'ना इलू इंडिया' (2018) यांसारख्या 20 पेक्षा जास्त चित्रपटात दिसला आहे. त्याचे तीन चित्रपट 'एए19', 'एए20' आणि 'आयकॉन' सध्या फ्लोअरवर आहे.