आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उष्णतेची लाट : मार्चअखेर तापमानाचा कहर, राज्यातील 17 शहरांत पारा चाळिशीपार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच वाढत्या तापमानाचा कहर राज्यात दिसतो आहे. शुक्रवारी राज्यातील १७ शहरांत पारा ४० अंश सेल्सियसच्या वर होता. राज्यात सर्वाधिक तापमान ४३.२ अंश अकोला येथे नोंदण्यात आले. राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एक एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
    
पुणे वेधशाळेनुसार, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच पारा चाळिशीपार गेला आहे. शुक्रवारी राज्यातील १७ शहर व जिल्ह्यांत ४० अंशांवर तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारीही राज्यातील १८ जिल्ह्यांत तापमान ४० अंशांवर होते. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार, राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात उष्णतेची लाट होती. एक एप्रिलपर्यंत राज्यात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.   

 

महाराष्ट्रात उष्णतेची लाट
राज्यात सर्वाधिक तापमान ४३.२ अंश अकोला येथे नोंदण्यात आले
औरंगाबादेत पारा ४१.२ अंशांवर, तर बीडमध्ये तापमान ४१.५ अंश

 

विदर्भात पावसाचा इशारा  
पुणे वेधशाळेनुसार ३० व ३१ मार्चला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.    
३० मार्च ते एक एप्रिल मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता.    


अकोला 43.2 
अहमदनगर 42.6
अमरावती 42.6
औरंगाबाद 41.2
बीड 41.5
चंद्रपूर 40.6
जळगाव 42
मालेगाव 42.8
नागपूर 41.2
नांदेड 41.0
नाशिक 40.0
उस्मानाबाद 40.5
परभणी    42.1
पुणे 40.4
सोलापूर 42.2 
वर्धा 42.0
यवतमाळ 41.5

बातम्या आणखी आहेत...