आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरातून निघालेले हे 'Virgin' केस विदेशी मार्केटपर्यंत कसे पोहोचतात, जाणून घ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संस्कृतीमध्ये मंदिरात केस अर्पण करण्याची प्रथा अत्यंत जुनी आणि प्रसिद्ध आहे. विशेषतः दाक्षित भारतात या प्रथेचे जास्त महत्त्व आहे. परंतु या केसांचा विदेशामध्ये कशाप्रकारे कोटींचा बिझनेस होतो, हे तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, मंदिरातून निघालेले हे 'वर्जिन'केस विदेशी मार्केटपर्यंत कसे पोहोचतात.


मंदिरातून चीनमध्ये पोहोचतात हे 'वर्जिन' केस
सर्वात पहिले हे जाणून घ्या की, या केसांना वर्जिन का म्हटले जाते? दक्षिण भारतातील यदागिरिगुट्टा मंदिरात भगवान विष्णूला अर्पण करण्यात आलेले केस जन्मानंतर कधीही कापलेले आणि कलर केलेले नसतात. यामुळे या केसांना वर्जिन म्हटले जाते, या मंदिरात मुली लाईन लावून आपले केस कापून घेण्यासाठी उभ्या असतात. 18 ते 20 वर्ष वाढवलेले केस मंदिरात बसलेले न्हावी काही मिनिटातच डोक्यापासून वेगळे करतात. सांगायला हे केस अर्पण केल्याने देवता खुश होतात परंतु वास्तवामध्ये खरा बिझनेसतर यानंतर सुरु होतो.


मंदिरातून थेट चीनला पोहोचतात हे केस
या मंदिरांमध्ये एक दिवसात जवळपास 50 हजार महिला केस दान करतात. मंदिराचे ट्रस्टी किंवा पुजारी हे केस एकत्र करून चीनच्या व्यापाऱ्यांना विकतात. दक्षिण भारतातील तिरुमला मंदिराला या केसांपासून प्रत्येक वर्षी जवळपास 2 अब्ज रुपयांचा फायदा होतो. या केसांना 'ब्लॅक गोल्ड' म्हणजेच 'काळं सोनं' म्हटले जाते. चीनमध्ये या केसांचे विगमध्ये रूपांतर केले जाते. ही प्रोसेस खूप मोठी असते, परंतु चिनी कामगारांना या कामाचे फार कमी पैसे दिले जातात. जो काही फायदा होतो तो या इंटरनॅशनल ट्रेडच्या मालकांचा असतो.


युरोपियन देशांमध्ये या केसांना भरपूर मागणी
एकदा चीनला पोहोचल्यानंतर केसांवर प्रोसेस करून ते बाहेर पाठवले जाते. भारतीय मंदिरांमध्ये अर्पण केलेले हे केस खूप लांब असतात. भारतीय महिला हे केस केमिकल नसलेल्या शाम्पूने धुतात, त्यामुळे हे खूप स्मूथ असतात. यामुळे या केसांना सहजपणे डाय केले जाऊ शकते. लांब काळ्या केसांना तपकिरी-सोनेरी रंगामध्ये डाय करून युरोपियन देशांमध्ये पाठवले जाते


विदेशात जास्त किमतीत विकले जातात हे केस
ज्या केसांना मंदिरात देवाला धन्यवाद करण्यासाठी अर्पण केले जाते, ते आता विदेशात जास्त किमतीमध्ये विकले जातात. लाल ब्राऊन कलर केलेल्या केसांची किंमत साडेतीन हजार रुपये तर डार्क ब्राऊन केसांची किंमत जवळपास 3 हजार रुपये असते. विदेशी क्लिनिक्समध्ये अशा अनेक महिला येतात, ज्या जवळपास एक लाख रुपये खर्च करून या आर्टिफिशिअल केसांची खरेदी करतात.

बातम्या आणखी आहेत...