आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवघरामध्ये या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास लवकर यशस्वी होते पूजा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुतांश घरांमध्ये देवी-देवतांच्या मूर्ती, फोटो स्थापनेसाठी स्वतंत्र देवघर असते. काही घरांमध्ये छोटे-छोटे देवघर बनवले जातात. नियमितपणे देवघरात पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होतात. घरातील वातावरण पवित्र आणि सकारात्मक राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, देवघर संदर्भात कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...


1. पूजा करतना कोणत्या दिशेला असावे आपले मुख
घरामध्ये पूजा करणार्‍या व्यक्तीचे तोंड पश्चिम दिशेकडे असेल तर अत्यंत शुभ राहते. यासाठी देवघराचे द्वार पूर्व दिशेला असणे आवश्यक आहे. हे शक्य नसेल तर पूजा करताना व्यक्तीचे मुख पूर्व दिशेला असल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात. दक्षिण दिशेकडे मुख करून पूजा करू नये कारण ही यमदेवाची दिशा मानली जाते.


2. घरामध्ये ज्या ठिकणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल-बूट घेऊन जाऊ नये. 


3. देवघरात मृतक आणि पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. देवघराच्या खोलीत पुजेशी संबंधित सामानच ठेवावे.


4. घरातील मंदिराच्या जवळपास बाथरूम असणे अशुभ मानले जाते. त्यामुळे अशा ठिकाणांपासून देवघर दूर ठेवावे. जर एखाद्या छोट्या खोलीत देवघर असेल तर तेथे थोडीशी एका व्यक्तीला बसत येईल एवढी तरी जागा मोकळी सोडावी.


5. घरामध्ये देवघर असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे. पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी. तसेच संपूर्ण घरात फिरून घंटानाद करावा. असे केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते.


6. पूजेमध्ये शिळे, सुकलेले फुल-पान अर्पण करू नये. स्वच्छ आणि ताज्या पाण्याचा उपयोग करावा. या संदर्भात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी की तुळशीचे पान आणि गंगेचे पाणी कधीही शिळे मानले जात नाही. त्यामुळे यांचा उपयोग केव्हाही केला जाऊ शकतो. इतर सामग्री ताजीच असावी. एखाद्या फुलाचा वास घेतला असेल किंवा ते खराब झाले असेल तर देवाला अर्पण करू नये.


7. घरामध्ये देवघर अशाठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते, त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते.

बातम्या आणखी आहेत...