आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब-गजब: 7 वर्षांपूर्वी या ठिकाणी विजयासाठी आसुसली होती टीम इंडिया, मग स्टेडिअमध्ये मंदिर उभारल्यानंतर एकही मॅच हरला नाही भारत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


स्पोर्ट्स डेस्क: आयुष्यात कष्ट, दुःख आले की लोक देवाकडे धावा घेत असतात. क्रिकेटमध्येही काहीसे असेच घडल्याचे दिसून येत आहे. चक्क एका आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमध्ये प्रवेश केल्यानंतर एक मंदिरा दृष्टीक्षेपास पडते. या स्टेडिअमध्ये सध्या भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात सध्या टेस्ट सीरिजची दुसरी टेस्ट मॅच सुरु आहे.

 

भारतीय टीमच्या विजयासाठी बनवण्यात आले मंदिर...
मंदिरते पुजारी हनुमंत शर्मा यांनी सांगितल्यानुसार, 'भारतीय टीम आणि आयपीएलची जुनी टीम डेक्कन चार्जर्स येथे एकही मॅच जिंकू शकत नव्हती. हे मैदान भारतीय टीमसाठी फलदायी ठरत नव्हते. जेव्हा आम्ही यासंदर्भात चौकशी केली तेव्हा येथे आम्हाला वास्तू दोष आढळला. त्यानंतर आम्ही यशासाठी 2011 मध्ये मंदिराची स्थापना येथे केली.'

 

पहिल्यांदा इंग्लंडविरुद्धची मॅच जिंकला होता भारत..
हनुमंत शर्मा यांनी सांगितले, 'श्रीगणेश वास्तू दोष निवारण करणारा देव आहे. त्यामुळे श्रीगणेशाचे मंदिर याठिकाणी उभारण्यात आले. 2011 पासून भारतीय क्रिकेट टीम या मैदानावर एकही मॅच हरलेली नाही.'

 

हनुमंत यांनी पुढे सांगितले की, अनेक भारतीय क्रिकेटपटू मॅचपूर्वी किंवा मॅचच्या दरम्यान येथे येत असतात. माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी येथे कायम येत असतो. कर्ण शर्माही येथे अनेकदा येत असतो. 

 

स्टेडिअममधील टीम इंडियाचा रेकॉर्ड 
भारताने या स्टेडिअममध्ये पहिला वनडे सामना 2005 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यात भारताला पाच विकेटनी हार पत्करावी लागली होती. 2007 आणि 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवले होते. मंदिराची स्थापना झाल्यानंतर 2011 मध्ये भारतने इंग्लंडला आणि 2014 मध्ये श्रीलंकेला हरवले होते. येथे पहिली टेस्ट मॅच 2010 मध्ये न्युझिलंडविरुद्ध खेळली गेली होती. ती मॅच ड्रॉ राहिली होती. त्यानंतर भारताने 2012 मदध्ये न्युझिलंड, 2013  मध्ये ऑस्ट्रेलिया आणि 2010 मध्ये बांग्लादेशला हरवले होते. तर पहिली टी-20 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली जाणार होती, पण पावसामुळे सामना रद्द झाला होता.  

 

बातम्या आणखी आहेत...