आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकात मशीद तोडल्यावर सापडले मंदिर? व्हायरल होतोय हा फोटो; सोबत लिहिला आहे धोकादायक मेसेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - काही दिवसांपासून मशीद तोडल्यानंतर मंदिर आढळल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. @umagarghi नामक ट्विटर हँडलने हा फोटो शेअर केला आहे. सोबतच एक मेसेज लिहिला होता. त्याचा मराठी अनुवाद काहीसा असा आहे - 'कर्नाटकात रायचूर येथे रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी तोडण्यात आलेल्या मशिदीमध्ये मंदिर आढळून आले. आपल्याला इतर मशिदी पाडण्याची आवश्यकता आहे.' 

 

नेमका काय फोटो?
> फोटोमध्ये असलेल्या भिंतीवर देवीची प्रतिमा दिसत आहे. त्यासमोरील पायऱ्यांवर काही लोकं उभे असलेले दिसत आहे. रायचूरमध्ये रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी तोडण्यात आलेल्या मशिदीमध्ये मंदिर आढळून आल्याचा दावा केला जात आहे. 11 नोव्हेंबरला करण्यात आलेल्या ट्विटला अनेक जणांनी रिट्विट केले आहे.


फोटोची सत्यता

> या फोटोच्या खालच्या भागावर 'चंद्रा कलरिस्टचा' लोगो दिसत आहे. यावरून हा फोटो एखाद्या कलाकाराने केलेली रचना वाटत आहे. चंद्रा कलरिस्ट फेसबुक नामक अकाउंटवर 8 मे 2016 रोजी पोस्ट करण्यात आली होती. पोस्टवर मंदिराबद्दल विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना तो फोटो त्याची डिजिटल कलाकृती असल्याचे युझरने सांगितले. त्यामुळे पोस्टवर फोटोबाबत केलेला दावा खोटा असून ती फक्त एका कलाकाराची डिजिटल कलाकृती आहे. 

 

गूगलवर सर्च केल्यावर काय मिळाले?
> जेव्हा आम्ही Google वर या फोटोचा शोध घेतला तेव्हा आम्हाला 12 एप्रिल 2016 रोजी मेकियानबाओचा घेतलेला फोटो सापडला. त्यावर चंद्राने त्याची डिजिटल रचना केली असेल. जर दोन्ही छायाचित्रे काळजीपूर्वक बघितली तर चंद्राने तयार केलेल्या वरील चित्राची अनेक वैशिष्ट्ये खालील चित्रातदेखील दिसू शकतात. चीनच्या हेनानमधील लुओयांग येथील बौद्ध मंदिराचा फोटो  Google वर दाखविला आहे. त्यामुळे सदरील फोटो डिजिटल आर्टवर्क आहे, परंतु त्यासंबंधी केलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...