आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पानचक्की, शाहगंज मशीद आणि दिल्ली गेटसह 10 वास्तूंच्या पुनरुत्थानसाठी 5.75 कोटींची मदत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली गेट, औरंगाबाद - Divya Marathi
दिल्ली गेट, औरंगाबाद
  • 3 दरवाजे, 4 मशीदी, 1 महाल आणि पानचक्कीची होणार डागडुजी
  • प्रसिद्ध दिल्ली गेटच्या कायापालटासाठी सर्वाधिक 1.2 कोटी रुपये

औरंगाबाद - महाराष्ट्र पुरातत्व विभागाने औरंगाबादच्या 10 ऐतिहासिक वास्तूंच्या पुनरुत्थानासाठी 5.75 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी मंगळवारी ही माहिती जाहीर केली. यामध्ये तीन ऐतिहासिक गेट, चार मशीदी आणि एका महालासह पानचक्कीची दुरुस्ती केली जाणार आहे. या 10 वास्तूंच्या डागडुजीसाठी खर्च आणि त्यासंदर्भातील आदेश कोर्टाच्या आदेशावरून काढण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतरच निविदा काढण्यात आल्या होत्या असे गर्गे यांनी सांगितले आहे.

दिल्ली गेटच्या कायापालटासाठी सर्वाधिक 1.2 कोटी रुपये
 
कोणत्या ऐतिहासिक वास्तूसाठी किती खर्च होणार याची सविस्तर माहिती देखील गर्गे यांनी दिली. त्यानुसार, काली मशीदीच्या कामासाठी 56 लाख रुपये, पानचक्कीच्या कामांसाठी 75 लाख रुपये, चौक मशीदीसाठी 7.5 लाख रुपये, मकाई गेटसाठी 67 लाख रुपये, शाहगंज मशीदीसाठी 45 लाख रुपये, लाला हरदौल समाधीसाठी 41 लाख रुपये, नौखंडा महालसाठी 53 लाख रुपये, दिल्ली गेटसाठी सर्वाधिक 1.2 कोटी रुपये, लाल मशीदसाठी 25 लाख रुपये आणि भडकल गेटसाठी 75 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.