आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Plane Crash: अमेरिकेत टेक-ऑफ घेताना हँगरला धडकले विमान, 10 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेतील टेक्सास प्रांतात एका छोट्या विमान अपघातामध्ये किमान 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला. हे विमान टेक-ऑफ होत असताना अचानक तेथील हँगरला धडकले आणि आगडोंब उडाला. ही घटना अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार, रविवारी सकाळी घडली आहे. एडिसन शहर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 2 इंजिन असलेले छोटे विमान बीचक्राफ्ट बीई-350 किंग एअर असे होते. हे विमान डलास शहरापासून 32 किमी दूर एडिसन विमानतळावर उद्ध्वस्त झाले. विमानतळ प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे, विमानाने हँगरला धडकताच पेट घेतला. मदत पोहोचणार तोपर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला होता.