आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथम महापौर फुलसौंदर यांच्यासह दहा जणांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर : मारहाण करून दोघांनी बलात्कार केला असल्याची फिर्याद आदिवासी महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांचाही समावेश आहे. दरम्यान, संबंधित महिलेने दिलेली फिर्याद खोटी आहे. याप्रकरणाची शहानिशा करावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पोलिस अधीक्षक ईशू सिंधु यांना दिले आहे.    याप्रकरणी माजी महापौर भगवान फुलसौंदर, गणेश फुलसौंदर, महेश फुलसौंदर, अरुण फुलसौंदर (सर्व रा. बोरूडे मळा, नगर) व त्यांच्यासोबत असलेल्या पाच अनोळखी व्यक्ती अशा दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, १२ ऑगस्टला दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास बुरूडगाव रोडवरील पडिक रानात बकऱ्या चारत असताना भगवान फुलसौंदर यांच्यासह इतर लोक तेथे आले. तुला व तुझ्या कुटूंबियांना आमच्या सोबत सुरू असलेला जागेचा वाद मिटवायचा आहे की नाही, असे म्हणत लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केली. मारहाणी जखमी झाल्यानंतर अर्धवट बेशुध्द अवस्थेत असताना गणेश व महेश फुलसौंदर या दोघांनी बलात्कार केला. इतर आरोपींनी घेराव घालून पोलिस स्टेशनला गेल्यास तुला व तुझ्या कुटूंबियांना जीवे मारू, अशी धमकी दिली असल्याचे पिडीत महिलेने फिर्यादीत म्हअले आहे. पुढील तपास पोलिस उपाधीक्षक अतित पाटील करत आहेत.    दरम्यान, याप्रकरणातील आरोपी भगवान फुलसौंदर यांनी याप्रकरणाशी कोणताच संबंध नसल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर टाकला आहे. संबंधित महिला व तिच्या कुटूंबाला आपण ओळखत नसून घटना घडली तेव्हा आपण घरीच होतो, त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासावे, अशी मागणी फुलसौंदर यांनी समाजमाध्यमावर व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.  बुरूडगाव रोड परिसरात आदिवासी कुटूंबाकडून यापूर्वी असे अनेक प्रकार घडले आहेत. त्यात काही व्यापाऱ्यांचा देखील नाहक बळी गेला असल्याचेही फुलसौंदर यांनी यात म्हटले आहे.    शिवसेना आज एसीपींना भेटणार  फुलसौंदर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे. त्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे अधीक्षक सिंधू यांना निवेदन देण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी १० वाजता शिवसैनिक नेता सुभाष चौकात जमतील. त्यानंतर पोलिस अधीक्षकांना निवेदनासाठी जाणार असल्याची माहिती माजी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिली. याप्रकरणी पोलिस काय भूमिका घेतात? याकडे शहराचे लक्ष लागले आहे.    आमदार संग्राम जगताप धावले मदतीला  केडगाव हत्याकांड प्रकरणी शिवसेनेच्या रडारवर असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या मदतीला धावून आले आहेत. फुलसौंदर यांच्या विरूद्ध दाखल झालेला गुन्हा खोटा आहे. पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी करावी, अशी मागणी जगताप यांनी पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याकडे केली आहे. फुलसौंदर यांनी शहराचे प्रथम महापौर म्हणून त्यांनी पद भूषवलेले आहे. खोटा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...