आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याच्या खिशातून पडले दहा हजार रुपये; रिक्षाचालकाने मारला डल्ला, मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिसांनी मिळवली रक्कम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज - आडस येथे दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचे खिशातून रुमाल काढताना दहा हजार रुपये पडले होते. ते पैसे अपेरिक्षा चालकाने उचलून नेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे शेतकऱ्याचे पैसे पोलिसांनी तपास लावून परत मिळवून दिले.


लाडे वडगाव येथील रामकृष्ण महादेव लाड हे दिवाळी सणानिमित्त  ९ नोव्हेंबर रोजी खरेदीसाठी आडस येथे आले होते. खरेदी करतेवेळी खिशातून रुमाल काढताना त्यांचे दहा हजार खाली पडले. थोड्या वेळानंतर खिशात पैसे नसल्याचे लाड यांच्या लक्षात आले. त्यामुळे लाड यांनी आडस पोलिस चौकीत तक्रार दिली होती. त्यानुसार फौजदार सुतनासे व जमादार चोपणे यांनी धारूर येथे गेट वे नेटवर्कशी संपर्क साधून मुकेश शुक्ला यांच्या मदतीने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेंव्हा ऑटोरिक्षा चालक बागवान यांनी पडलेले पैसे उचलल्याचे दिसून आले. 


बागवान यांचा मोबाइल नंबर शोधून पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला. या वेळी बागवान यांनी पैसे सापडल्याचे कबूल करत  लाड यांना पोलिसांच्या मध्यस्तीने पैसे परत केले. तपास लावून अवघ्या काही तासांत पैसे परत मिळवून दिल्याने रामकृष्ण लाड यांनी पोलिसांचे आभार मानले. 

 

पोलिसांच्या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत
केज शहरातील वाहतुकीच्या ठिकाणी पाकिटमार तसेच अन्य चाेरीचे प्रकार घडत आहेत. पाेलिसांकडून महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले अाहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी शेतकऱ्याचे हातरुमाल काढताना पडलेले पैसे मिळण्यास मदत झाली. पाेलिस दलाच्या कॅमेरे बसवण्याच्या उपक्रमाबद्दल व्यापारी, नागरिकांतून स्वागत हाेत अाहे.

 

सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारीला लगाम घालणे शक्य
केज शहरात दिवसा अाणि विशेषत: रात्रीच्या वेळी रस्त्याने व महत्त्वाच्या ठिकाणी गाेंधळ घालणाऱ्यांची संख्या वाढत हाेती. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यापासून वाहतुकीला शिस्त तसेच गुन्हेगारीला वचक बसत अाहे. पोलिसांना अशा प्रवृत्तींवर लगाम बसवणे शक्य झाल्याची माहिती  उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत डिसले यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...