आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- दरराेज एक लाखाहून अधिक नागरिकांचा वापर असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली अाहे. ५ सप्टेंबरनंतर निविदा उघडण्यात येणार अाहे. दरम्यान कंत्राटदारांना शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात हाेईल.
शिवाजीनगरसह चाेपडा, यावल तालुक्यातील गावांना जाेडणाऱ्या जिल्हा परिषदेजवळील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गेल्या चार महिन्यांपासून वारंवार ब्रेक लागत अाहे. दीड महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने अाॅनलाइन निविदा प्रसिध्द करण्याची तयारी केलेली असताना अचानक महापालिका निवडणुकीची घाेषणा झाली हाेती. अाचारसंहिता लागू झाल्याने निविदा प्रक्रिया थांबवण्यात अाली हाेती. दरम्यान, पालिकेचा निकाल जाहीर हाेताच सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाणपुलाच्या कामाची निविदा प्रसिध्द केली अाहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाणपुलाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली अाहे. त्यात ५ सप्टेंबरपर्यंत निविदा दाखल करता येणार अाहेत. त्यानंतर ६ राेजी निविदा उघडण्यात येतील. ही प्रक्रिया सुरू असताना २९ अाॅगस्टला नाशिक येथे मुख्य अभियंत्यांकडे
शासनाकडे प्रस्ताव पाठवणार
निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदार निश्चित केला जाईल. परंतु, कमी दराच्या प्रस्तावाला मंजुरीसाठी शासनाकडे पाठवले जाणार अाहे. त्यामुळे निविदा उघडल्यानंतर त्याला अंतिम मंजुरी मिळाल्याशिवाय उड्डाणपुलाच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात हाेणार नाही. कामासाठी अाॅक्टाेबर महिना उजाडण्याची शक्यता अाहे.
तीन रस्ते हाेणार तयार
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या अलीकडील व पलीकडील दाेन्ही बाजूंचे काम हाती घेतले जाणार अाहे. यात जिल्हा परिषदेकडे येणारा रस्ता, शिवाजीनगर फेडरेशनकडे जाणारा व ममुराबाद रस्त्याकडे जाण्यासाठी स्वतंत्र तीन मार्ग केले जाणार अाहेत. या कामासाठी २१ काेटी ४१ लाख ७५ हजार १३० रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात अाली अाहे. रेल्वेच्या हद्दीतील उड्डाणपुलाच्या कामासाठी यापूर्वीच ८ काेटी ६४ लाख रुपयांची निविदा काढण्यात अाली अाहे. रेल्वे व पीडब्लूडी या दाेन्ही विभागांना १८ महिन्याच्या कालावधीत या पुलाचे काम पूर्ण करायचे अाहे.
१०५ वर्षे जुना पूल हटवणार
इंग्रजांच्या काळात शिवाजीनगर उड्डाणपुलाची उभारणी करण्यात अाली हाेती. या पुलाला १०५ वर्षे पूर्ण झाली असून ताे माेडकडीस अाला अाहे. काेणत्याही क्षणी पूल काेसळेल, अशी भीती व्यक्त हाेत अाहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनामार्फत त्याला तातडीने मंजुरी मिळवून अाणणे गरजेचे ठरणार अाहे. महापालिका निवडणुकीतही उड्डाणपुलाला प्रचारात महत्त्व प्राप्त झाले हाेते. त्यामुळे पुलाच्या कामाला गती देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्त्वपूर्ण ठरणार अाहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १०५ वर्षे जुना पूल हटवण्याचे पाऊल उचलले जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.