आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नूर सुलतान (कजाकस्तान) : भारतीय टेनिस संघाने कडाक्याच्या थंडीच्या वातावरणातही अव्वल कामगिरी करून डेव्हिस चषकातील आपल्या विजयाचा दावा मजबूत केला. भारतीय संघाने शुक्रवारी आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर २-० ने आघाडी घेतली. भारताच्या संघाने डेव्हिस चषक सामन्यातील सुरुवातीच्या दाेन्ही एकेरी सामन्यात धडाकेबाज विजयाची नाेंद केली. यासह भारताने पहिल्याच दिवशी अाघाडी मिळवली. रामकुमार रामनाथन आणि सुमीत नागलने एकेरीचे सामने जिंकले. यामुळे पहिल्या दिवशी विजयाचे खाते उघडून भारतीय संघाने अाघाडी निश्चित केली. आशिया अाेसनिया झाेन गटाच्या पहिल्याच एकेरी सामन्यात भारताच्या रामनाथनने पाकच्या १७ वर्षीय शाेएबवर मात केली. त्याने अवघ्या ४२ मिनिटांत ६-०, ६-० ने सामना जिंकला. हा स्पर्धेतील सर्वात लहान सामना ठरला.
रामनाथन व सुमीतने आपापले पहिले सेट २० पेक्षा कमी मिनिटांत जिंकले
जागतिक क्रमवारीत १७६ व्या स्थानावर असलेल्या रामनाथनने पहिल्या सामन्यात शाेएबला एकही गेम जिंकू दिला नाही. त्याने १२ पैकी सहा वेळा शाेएबची सर्व्हिस ब्रेक केली. यासह त्याने पहिला सेट अवघ्या १९ मिनिटांत जिंकून लढतीत आघाडी घेतली. त्यानंतर हाच कित्ता सुमीतने गिरवला. त्याने रहमानविरुद्ध सामन्यात दमदार सुरुवात करताना अवघ्या १८ मिनिटांमध्ये पहिला सेट जिंकला.
नूर सुलतानमध्ये उणे १६ डिग्रीचे तापमान; २४ गेम जिंकले
नूर सुलतान येथे सध्या प्रचंड थंडी आहे. या ठिकाणी आता उणे १६ डिग्रीचे तापमान नाेंद झाले. याच वातावरणामध्येही विजयाच्या इराद्याने इनडाेअर काेर्टवर उतरलेल्या भारतीय संघाने दाेन्ही सामन्यात मिळून एकूण २४ गेम जिंकले आहेत. दाेनमध्ये संघ अपयशी ठरला. आता आज शनिवारी पहिला सामना दुहेरीचा हाेणार आहे. या सामन्यात भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस हा सहकारी जीवन नेदुनचेजियानसाेबत खेळणार आहे. या जाेडीचा सामना पाकच्या एकेरीतील पराभूत शाेएब-रहमानशी हाेईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.