आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅस्ट्रेलियन कार्टुनिस्टने तयार केले टेनिसपटू सेरेनाचे वादग्रस्त कार्टून; वर्णभेदी असल्याचा हाेत अाहे अाराेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- जपानच्या नाअाेमी अाेसाकाविरुद्ध अमेरिकन अाेपनच्या फायनलनंतर सहा वेळची चॅम्पियन सेरेना ही चर्चेत अाली. या फायनलमध्ये सेरेनाचा पराभव झाला. तिने चेअर पंच रामाेस यांच्यावर पुरुष अाणि महिला असा लिंगभेद केल्याचा अाराेप लावला. यादरम्यान चांगलाच वाद रंगला. यानंतर टेनिस अाणि प्रसारमाध्यमे सेरेनाच्या बाजूने अाहेत, तर काही जण तिच्याविरुद्ध भूमिकेत अाहेत. याच दरम्यान अाता अाॅस्ट्रेलियन व्यंगचित्रकार मार्क नाइट यांच्या एका व्यंगचित्राने तर अजून भडका उडाला. त्यांनी नुकतेच सेरेनाचे कॅरिकेचर प्रसिद्ध केले. यामुळे पुन्हा वादाला सुरुवात झाली. हे चित्रच अाता वादाच्या भाेवऱ्यात सापडले. अाॅस्ट्रेलियाच्या हेराल्ड सनमध्ये याला प्रसिद्ध करण्यात अाले. 


नाइट यांनी अाॅस्ट्रेलियाच्या सर्वात लाेकप्रिय वृत्तपत्र हेराल्ड सनमध्ये एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले. यामध्ये त्यांनी सहा वेळची चॅम्पियन सेरेनाने रागाच्या भरात टेनिस काेर्टवर रॅकेट ताेडल्याचे दाखवले. तसेच दुसरीकडे 'सेरेनाला जिंकू देऊ शकतेस का?'असा प्रश्न चेअर पंच रामाेस हे अाेसाकाला विचारत असल्याचे दाखवले. या प्रसिद्ध झालेल्या या कार्टूनवरही कडाडून टीका झाली. नाइट यांच्यावर वर्णभेदचा अाराेप करण्यात अाला. 


अापल्या कार्टूनमुळे वादग्रस्त ठरलेल्या नाइट यांच्या या व्यंगचित्राला अातापर्यत ट्विटरपाेस्टवर तब्बल २२ हजार चाहत्यांनी काॅमेंट्स केल्या अाहेत. यामध्ये अधिकाधिक टीका झाल्याचे दिसते. हॅरी पॉटर सिरीजच्या लेखिका जेके रोलिंग यांनीही नाइटवर प्रचंड टीका केली. ' सेरेनाची प्रतिमा अशा प्रकारच्या चित्रातून डागाळण्यात अाली. अव्वल टेनिसपटूला चित्राच्या माध्यमातून असे दाखवायला नकाे,' अशा शब्दांत त्यांनी ही टीका केली. 


यावर नाइट यांनी स्पष्टाेक्ती दिली. अापण महिला खेळाडूंच्या प्रतिष्ठेवर भाष्य करत नाही, तर सेरेनाने केलेल्या गैरवर्तनावर प्रकाशझाेत टाकला अाहेे, असेही ते म्हणाले. 


संपादकांनी केली नाइट यांची पाठराखण 
हेराल्ड सनचे संपादक डेमन जाॅन्सटन यांनी व्यंगचित्रकार नाइट यांच्या या वादग्रस्त प्रकरणात पाठराखण केली. 'नाइट यांनी काढलेले व्यंगचित्र काेणत्याही दृष्टीने चुकीचे नाही. त्यांनी एका स्टार खेळाडूने केलेली सुमार खेळी अापल्या कलेच्या माध्यमातून अप्रतिम रेखाटली. यामधून भेदभाव केल्याचे दिसत नाही,'असे ते म्हणाले. 


सेरेनाचे वर्तन हे गैरच : नवरातिलाेवा 
माजी नंबर वन सेरेेना विल्यम्सने अमेरिकन अाेपनच्या फायनलमध्ये केलेेले वर्तन हे गैरच अाहे. तिने अशा प्रकारे वर्तन करणे चुकीचे ठरले. अापल्या खेळावर लक्ष केंद्रित केले असते तर सेरेनाला हाेणाऱ्या अन्यायाला चाेख प्रत्युत्तर देता अाले असते. मात्र, तिने तसे काहीही केले नाही. याचा माेठा फटका तिला बसला,' अशी प्रतिक्रिया ६१ वर्षीय माजी नंबर वन अाणि १८ वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन नवरातिलाेवाने दिली. तिने पुरुष व महिला खेळाडूंच्या बाबतीत हाेत असलेल्या भेदभावाशी सहमत असल्याचे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...