आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कनौजमध्ये भीषण अपघात; बस आणि ट्रकच्या धडकेत 24 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कनौज : शुक्रवारी रात्री येथे एका रस्ते अपघातात एसी स्लीपर बसमधील २४ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. ट्रक व बसची समोरासमाेर धडक झाल्यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. बसमध्ये ४५ हून अधिक प्रवासी होते. बस पेटल्यानंतर २४ लोकांना बसमधून बाहेर काढण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. आग लागल्याचे कळताच काही प्रवाशांनी बसच्या काचा फोडून बाहेर उड्या घेतल्या, परंतु अनेक प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत. पाहता पाहता बस पूर्ण पेटली. उत्तर प्रदेशातील फारुखाबादहून ही बस राजस्थानात जयपूरला जात होती. रात्री ८ च्या सुमारास छिबरामऊ भागात समोरून येणाऱ्या ट्रकला बसची धडक बसली आणि वाहने पेटली. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.


पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

बातम्या आणखी आहेत...