आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुराचा हाहाकार..केरळच्या मदतीसाठी ‘इस्रो’ने हेरगिरी करणाऱ्या उपग्रहासह १७ सॅटेलाइट लावले कामाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एनडीआरएफचे अधिकारी कन्हैया यांनी काही सेकंदांतच मुलीचा जीव वाचवला : - Divya Marathi
एनडीआरएफचे अधिकारी कन्हैया यांनी काही सेकंदांतच मुलीचा जीव वाचवला :

तिरुवनंतपुरम- केरळला ४० वर्षांतील सर्वात पुराचा फटका बसत आहे. ८ जिल्ह्यांत पुराचा सर्वाधिक परिणाम दिसून येतो. रविवारी काही वेळासाठी पाऊस थांबला. लष्कर, नौदल आणि एनडीआरएफचे जवान  बचावकार्यात लागले आहेत. सरकारसोबत सर्वसामान्यही आपापल्या परीने पीडितांची मदत करत आहेत. पुरामुळे आतापर्यंत ३७ लोकांचा मृत्यू झाला, तर ५४ हजार लोक बेघर झाले आहेत. ४३९ कॅम्प उभारण्यात आले आहेत. पुरामुळे ८,३१६ कोटींचे नुकसान झाल्याचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी सांगितले. २० हजार घरे आणि १० हजार किमीचे रस्ते उद्ध्वस्त झाले. केरळात आतापर्यंतचे सर्वात माेठे बचाव आणि पुनर्वसनाचे काम केले जात आहे.


पाच किलो तांदूळ दान करा आणि ५ लोकांना ‘चॅलेंज’ द्या
प्रतिध्वनी नावाचे टेक फोरम ‘राइस बकेट चॅलेंज’च्या माध्यमातून पूरपीडितांना मदत केली जात आहे. या चॅलेंजच्या माध्यमातून त्यांच्या कंपनीतील प्रत्येक व्यक्ती ५ किलो तांदूळ दान करत आहे. शिवाय ५ लोकांना असे करण्यासाठी आव्हानही दिले जात आहे. या मोहिमेतून जमा होणारे तांदूळ पीडितांपर्यंत पाठवले जात आहेत. प्रतिध्वनीचे सदस्य लोकांनाही मदत करण्यासाठी आवाहन करत आहेत. मध्य प्रदेशातील विष्णू कछावा केरळात घरोघरी जाऊन ब्लँकेट विकण्याचे काम करतात. पुराची माहिती मिळताच त्यांनी विक्रीसाठीचे ५० ब्लँकेट पुरातील लोकांना दान केले. विष्णू गेल्या १२ वर्षांपासून येथे ब्लँकेट विक्रीचे काम करत आहेत. 


पडलेल्या झाडांपासून ४० फूट लांबीचे पूल उभारले
केरळमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यावर ४८ तासांच्या आत लष्कराने मदतकार्य सुरू केले. ८ तुकड्या येथे आहेत. पुरामुळे उन्मळून पडलेल्या झाडांना जोडून हे जवान आणि एनडीआएफ ४०-४० फूट लांबीचे तात्पुरते उड्डाणपूल उभारत आहेत. या पुलांच्या मदतीने लोकांना वाचवले जात आहे. हवाईदलाची दोन विमानेही दाखल झाली असून नौदलाच्या ५, कोस्ट गार्डची ३ पथके या कार्यात आहेत. एनडीआरएफ आणि एसडीअारएफची १४-१४ पथके पहिल्या दिवसापासून लोकांना अन्न पुरवण्यापासून मदत छावण्यात पोहचवण्यापर्यंत कार्यरत आहेत. महिला कमांडोही या बचावकार्यात अग्रेसर आहेत. 


इस्रोचे उपग्रह देत होतेरात्रभर पुराची माहिती
इस्रोने आपल्या १७ उपग्रहांमार्फत केरळमधील परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. यात इन्सॅट-३डीसारखे उपग्रह आहेत. आपत्तीची अचूक माहिती मिळू शकेल, अशी यंत्रणा या उपग्रहांमध्ये आहे. कुठल्या भागात लोक अडकून पडू शकतात, हे उपग्रह सांगतात. ६-टाइम इमेजरच्या माध्यमातून हे उपग्रह साधारण उपग्रहांपेक्षा सहापट स्पष्ट छायाचित्रे पाठवत आहेत. विशेषत: रात्रीची छायाचित्रेही अगदी स्पष्ट आहेत. इस्रोचा हेरगिरीसाठी वापरला जाणार उपग्रहही यात आहे. दाट ढग, पाऊस आणि वादळातही हा उपग्रह अगदी स्पष्ट छायाचित्रे पाठवू शकतो. ही माहिती जिल्हा स्तरावर संबंधित यंत्रणांना सातत्याने पाठवली जात आहे. 

 

एनडीआरएफचे अधिकारी कन्हैया यांनी काही सेकंदांतच मुलीचा जीव वाचवला

इडुक्की नदीच्या पुलावरील पाणी अचानक वाढले.  पुलावरील सर्वच पळाले. पण एक मुलगी तेथे फसली. त्याच वेळी पुलाच्या दुसऱ्या कडेला असलेले कन्हैया तेथे पळत आले. मुलीला उचलून पळत त्यांनी पूल पार केला. काही सेकंदांतच पुरात पूल वाहून गेला.

 

बातम्या आणखी आहेत...