आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Terrific Explosion In The Factory; 23 People, Including 18 Indians, Were Killed And More Than 130 Were Injured In Sudan

सुदानमध्ये फॅक्टरीत स्फोट; १८ भारतीयांसह २३ ठार, १३० जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विस्फोट मंगळवारी संध्याकाळी खार्तूनच्या सीला सिरॅमिक फॅक्टरीत झाला
  • सलूमी सिरॅमिक फॅक्टरीमध्ये ठेवलेल्या 34 भारतीयांना वाचवण्यात यश
  • 7 भारतीय नागरिक रुग्णालयात भर्ती, 4 जणांची प्रकृती गंभीर

खार्तुम - सुदानमध्ये सिरॅमिक फॅक्टरीमध्ये एलपीजी टँकरच्या झालेल्या भीषण स्फोटामुळे लागलेल्या आगीत २३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १८ भारतीयांचा समावेश आहे. या आगीत १३० लोक जखमी झाले असून प्रारंभिक माहितीनुसार सात भारतीयांचा जखमींमध्ये समावेश आहे. सुदानची राजधानी खार्तुमच्या बाह्य भागात असलेल्या सेला सिरॅमिक फॅक्टरीमध्ये मंगळवारी हा स्फोट झाला. अद्याप १६ भारतीय बेपत्ता असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय वकिलातीने या स्फोटाची माहिती दिली. आगीत जळालेल्या मृतदेहांची ओळख पटवणे कठीण असल्याचे वकिलातीने म्हटले आहे. बेपत्ता लोकांपैकी काही जणांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त होत आहे.


बेपत्ता भारतीय
 :


बिहार : रामकुमार, अमित तिवारी, हरिनाथ, नितीशकुमार मिश्रा, उत्तर प्रदेश : जिशान खान, मोहित, प्रदीप वर्मा, तामिळनाडू : रामकृष्ण, राजशेखर, वेंकटचलम, राजस्थान : भजनलाल, जयदीप, हरियाणा : पवन, प्रदीप, गुजरात : बहादूर व दिल्ली : इंतजार खान.

रुग्णालयातील भारतीय : तामिळनाडू : जयकुमार, बोबलन, मोहंमद सलीम, राजस्थान : रवींदरसिंह, सुरेंदरसिंह, बिहार : नीरजकुमार व उत्तर प्रदेश : सोनू प्रसाद.बातम्या आणखी आहेत...