आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Terror Attack: पाकिस्तानात चीनच्या दूतावासावर दहशतवादी हल्ला, बेछूट गोळीबारात दोन जणांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची - पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीत चीनच्या दूतावासावर शुक्रवारी दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात किमान 2 जणांचा मृत्यू झाला असून आणखी एक जण जखमी आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दूतावासात अचानक 4 सशस्त्र हल्लेखोर घुसले आणि बेछूट गोळीबार सुरू केला. यावेळी उडालेल्या चकमकीत 2 पोलिस जवानांचा मृत्यू झाला. तसेच एक जण गंभीर जखमी आहे. गोळीबार करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. परंतु, त्यापैकी सगळेच निघून गेले की अजुनही काही हल्लेखोर दूतावास परिसरात आहेत याचा तपास केला जात आहे. 

 

दूतावासावर हल्लाचे काही फोटो स्थानिकांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यामध्ये दूतावासाच्या इमारतीवर मोठा धूर दिसून आला. कराची पाकिस्तानचे सर्वात मोठे आणि आर्थिक घडामोडींचे गढ मानले जाते. तरीही गेल्या अनेक वर्षांपासून या शहरात शिया-सुन्नी जातीय हिंसाचारासह दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरू आहेत. पाकिस्तानात अनेक देशांचे वाणीज्य दूतावास आहेत. त्यापैकीच एक आणि पाकिस्तानचा सर्वात मोठा गुंतवणूकदार आणि मित्र राष्ट्र चीनचे वाणीज्य दूतावास देखील याच शहरात आहेत. त्यामुळे, शुक्रवारच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान आपल्या नागरिकांचेच नव्हे, तर मित्र राष्ट्राच्या दूतावासाचे रक्षण करण्यातही अपयशी ठरत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...