आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Attack News In Marathi, Naxalite, CRPF, Jawan

निवडणुकीपूर्वी स्फोट, चकमक; डेप्युटी कमांडरसह पाच शहीद, दोन जवान बेपत्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू-पाटणा-रांची- लोकसभा निवडणुकीपूर्वी नक्षलवादी आणि दहशतवादी सक्रीय झाले आहेत. गेल्या 24 तासांत एक जेसीओ, सीआरपीएफचे डेप्युटी कमांडर आणि लष्कराचे तीन जवान शहीद झाले असून अनेक जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर दोन पोलिस अद्याप बेपत्ता आहेत.
जम्मू येथील कुपवाडा परिसरात लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आणि बिहारच्या जमुई परिसरात नक्षलवादी आणि निमलष्करी जवानांमध्ये जोरदार चकमक उडाली आहे. कुपवाडा येथील चकमकीत लष्कराचा जेसीओ आणि एक पोलिस मृत्युमुखी पडले आहेत.
बिहारमधील नक्षलग्रस्त भागात अनेक बॉम्ब सापडत आहेत. बिहारमधील औरंगाबादमध्ये काल (सोमवार) नक्षलवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात सीआरपीएफचे डेप्युटी कमांडर इंद्रजीत आणि दोन जवान शहीद झाले. या घटनेत आठ जवान गंभीर जखमी झाले आहेत.
यासंदर्भात काल वृत्तवाहिन्यांवर इंद्रजीत मदतीची मागणी करीत असतानाचे लाईव्ह कव्हरेज दाखविण्यात आले होते. परंतु, वृत्तवाहिन्यांवर इंद्रजीत नव्हे तर निमलष्कराचा जवान दिलीप याला दाखविण्यात आले, असे स्पष्टीकरण औरंगाबादचे डीएम अभिजीतकुमार सिन्हा यांनी दिले आहे. दिलीपवर रांची येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इतरांचा जीव वाचविण्यासाठी बॉम्ब निकामी करण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झालेल्या इंद्रजीत यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या उपचारात निष्काळजीपणा दाखविण्यात आला असल्याचा आरोप केला आहे. देशातील नेते मंडळी मजा मारीत आहेत. परंतु, देशाचे रक्षण करणारे अधिकारी-जवान उपचारा अभावी तडफडून मरत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. यापूर्वी जखमी जवानांवर पाटण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र इंद्रजीत यांना उपचारासाठी रांचीला का हलविण्यात आले हे न पटण्यासारखे आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.