Home | International | Pakistan | terrorist-attack-on-pakistan-security-post

सुरक्षा चौकीवर ७० दहशतवाद्यांचा हल्ला

वृत्तसंस्था | Update - May 20, 2011, 11:23 AM IST

पाकिस्तानातील पेशावरमधील एका सुरक्षा चौकीवर बुधवारी ७० पेक्षा अधिक दहशतवाद्यांनी हल्ला केला.

  • terrorist-attack-on-pakistan-security-post

    पाकिस्तानातील पेशावरमधील एका सुरक्षा चौकीवर बुधवारी ७० पेक्षा अधिक दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ल्यात दोन सुरक्षारक्षकांसोबत १७ जण मारले गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गढ खैबरजवळ असलेल्या सुरक्षा चौकीवर हा हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांकडे वेगवेगळी हत्यारे आणि रॉकेट लॉंचर होती.

    सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये सुमारे साडेचार तास चकमक सुरू होती. यामध्ये दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला आणि पाच सुरक्षारक्षक जखमी झाले. सुरक्षारक्षकांनी दिलेल्या प्रत्युत्तरात १५ दहशतवादी ठार झाले. मंगळवारी रात्रीही दहशतवाद्यांनी या चौकीवर हल्ला केला होता.

    वाहनावर हल्ला
    क्वेटा शहरात अज्ञात बंदूकधाऱयांनी एका वाहनावर हल्ला चढविला. यामध्ये पाच लोक मृत्युमुखी पडले आणि अनेकजण जखमी झाले. सरयाब भागातील एका बाजारात हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात चार लोक जागीच ठार झाले तर आणखी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Trending