आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Terrorist Camp Back In Balakot; 500 Terrorists Trying To Enter India ',says Army Chief Bipin Rawat

'बालाकोटमध्ये दहशतवादी शिबीर परत सक्रीय; 500 दहशतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात', लष्कर प्रमुखांची माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी आज(सोमवार) सांगितले की, भारतीय वायुसेनेच्या एअर स्ट्राइक नंतर अंदाजे 6 महिन्यानंतर पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये दहशतवादी शिबीर परत सक्रीय झाले आहे. जैश-ए-मोहम्मद सहित अनेक संघटनांनी दहशतवाद्यांना येथे ट्रेनिंग देणे सुरू केले आहे. अंदाजे 500 हदशतवादी काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. हे शिबीर पुन्हा सक्रीय झाल्यामुळे हे साफ झाले आहे की, त्या ठिकाणी आपल्या एअर स्ट्रइकमुळे चांगलेच नुकसान पोहचले आहे.

जनरल रावत पुढे म्हणाले, "काही दिवसांपासून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी परत बालाकोटमध्ये आपल्या कारवाया सक्रीय केल्या आहेत. यातून हे स्पष्ट होते की, बालाकोटवर केलेल्या एअर स्ट्राइक मध्ये त्यांचे चांगलेच नुकसान पोहोचले आणि हल्ला त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्या हटल्यानंतर दहशतवादी पळून गेले होते, पण आता ते परत येत आहेत.""मला असे वाटते की, काही लोक इसमाला बद्दल चुकीच्या धारणा पसरवत आहेत. धर्मात काहीच चुकीचे नाहीये, पण काही लोक याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. याला ऐकणारे लोक प्रभावित होऊन, वाईठ मार्गाला जात आहेत. आपल्याकडे इस्लामचे अनेक धर्मगुरू आहेत, जे चांगल्या गोष्टी सांगू शकतात."

बातम्या आणखी आहेत...