आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पुलवामा हल्ल्यात जैशचा हात, पाकिस्तानात आजही 40 दहशदवादी संघटना सक्रिय'- इम्रान खान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी अमेरिका दौऱ्यावर पाकिस्तानात दहशदवादी संघटना काम करत असल्याचे कबुव केले. ते अमेरिकेतील खासदार शीला जॅक्सनकडून कॅपिटल हिलमध्ये आजोजित रिसेप्शनमध्ये सामिल झाले होते. येथे ते म्हणाले,''आजही पाकिस्तानात 30 ते 40 हजार दहशदवादी उपस्थित आहेत. यातील काही प्रशिक्षीत दहशदवादी काश्मीर आणि अफगानमध्ये लढत आहेत. एकेकाळी देशात 40 दहशदवादी संघटना सक्रिय होत्या, पण मागील 15 वर्षांपासून पाकिस्तानने ही बाब अमेरीकेपासून लपवली आहे.

 

'9/11 सोबत पाकिस्तानचा काहीही संबंध नाही'
इम्रान म्हणाले, "आम्हीदेखील अमेरीकेप्रमाणेच दहशदवादाविरुद्ध लढाई लढत आहोत. पाकिस्तानचा 9/11 सोबत काहीच संबंध नाहीये. अलकायदादेखील अफगानिस्तानमध्ये होती. पाकिस्नातात तालिबानचे दहशदवादी नव्हते. दुर्भाग्याने जेव्हा मी सरकारवर आरोप लावले, तेव्हा सरकारने अमेरीकेला पाकिस्तनात काय होत आहे, याची कल्पनाही दिली नाही."

 

"पाकिस्तानात एकेकाळी 40 दहशदवादी संघटना सक्रिय होत्या. त्यावेळेस आम्हाला आम्ही जगू की नाही अशी भीती वाटत होती. जेव्हा अमेरीकेला वाटायचे की, पाकिस्तानने मदत करावी, तेव्हा आम्ही स्वथःच्या अस्तित्वाची लढाई लढत होतोत. माझे अमेरिकेच्या राष्ट्रपती आणि मोठ्या नेत्यांना भेटणे खूप गरजेचे होते. दोन्ही देशांमध्ये विश्वास निर्माण करणे खूप गरजेचे आहे."


सोबत मिळून अफगानिस्तानचा प्रश्न सोडवू
"अफगानिस्तानात आम्ही तालिबानला चर्चेसाठी बोलवण्याची महत्त्नाची भूमिका पार पाडली आहे. हे खूप अवघड असेल, पण संपूर्ण पाकिस्तान आमच्यासोबत आहे. अफगानिस्तनमध्ये शांती प्रस्थापित करणे, हेच आमचे आणि अमेरीकेचे लक्ष आहे."

बातम्या आणखी आहेत...