Home | International | Other Country | terrorist tahauuar rana relation between isi is exposed in shicago court

मुंबई हल्ल्यात 'आय़एसआय'चा हात, राणाची न्यायालयात कबुली

Agency | Update - May 24, 2011, 11:43 AM IST

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अमेरिकेचे सहाय्यक ऍटार्नी जनरलने मुळचा पाकिस्तानी असलेला दहशतवादी तहव्वुर राणा याची पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'आयएसआय'शी संबंध असल्याचा खुलासा केला आहे.

 • terrorist tahauuar rana relation between isi is exposed in shicago court

  rana_256शिकागो - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अमेरिकेचे सहाय्यक ऍटार्नी जनरलने मुळचा पाकिस्तानी असलेला दहशतवादी तहव्वुर राणा याची पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'आयएसआय'शी संबंध असल्याचा खुलासा केला आहे.

  या प्रकरणातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा आणि डेव्हिड हेडली यांचे "आयएसआय'शी घनिष्ठ संबंध होते, असा युक्तिवाद न्यायालयात सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. राणा याच्याविरुद्धच्या खटल्याची सुनावणी फेडरल न्यायालयात सुरू झाली. शिकागो येथील डिर्कसेन फेडरल न्यायालयात तहव्वूर राणा विरुद्धच्या खटल्याची सुनावणी सुरू झाली. त्या वेळी सुरवातीलाच राणा आणि हेडली यांच्यातील संभाषणाचे पुरावे असल्याचे सरकारी पक्षातर्फे सांगण्यात आले. "मुंबईवरील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राणा याने हेडली याच्याशी संपर्क साधला होता आणि भारतीयांवर असा हल्ला होणे गरजेचे होते, असे वक्तव्य केले होते,'' अशी माहिती सरकारी पक्षाच्या वकील सारा स्ट्राईकर यांनी न्यायालयात दिली.

  "राणा आणि हेडली यांचे अनेक वर्षांपासून संबंध होते. मुंबई आणि परिसरातील छायाचित्रे आणि व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे काम डेव्हिड कोलमन हेडलीने केले होते. त्याला "कव्हर' करण्याचे काम राणाने केले, तर हेडली चालवत असलेल्या "इमिग्रेशन' व्यवसायात त्याचा प्रतिनिधी म्हणून काम करत असल्याचे राणाने दर्शविले होते,'' अशी माहिती स्ट्राईकर यांनी न्यायालयात सांगितली.

  या खटल्याच्या सुनावणीदरम्यान राणा आणि हेडली यांच्या जबानीतून लष्करे तैयबा आणि पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय यांच्यातील संबंधांवर अधिक प्रकाश पडण्याची शक्‍यता आहे. हेडली याने दोषी असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे हेडलीच्या जबानीचा उपयोग राणाविरुद्ध करण्यात येऊ शकतो. राणाच्या खटल्याची सुनावणी 12 जणांच्या न्यायमंडळापुढे होत आहे.  शत्रूच्या प्रदेशात जाऊन कारवाईस भारतही सज्ज

Trending