आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jammu-Kashmir: शोपियांमध्ये पोलिस स्टेशनवर दहशतवाद्यांचा हल्ला, पोलिस जवान शहीद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये रविवारी सकाळी दहशतवाद्यांनी एका पोलिस स्टेशनवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले आणि गोळीबार केला. यादरम्यान पोलिस कर्मचाऱ्यांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. चकमकीदरम्यान एका पोलिस जवानाला गोळी लागली, त्याचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

 

चकमकीत 3 दहशतवादी ठार
सुरक्षा दलांनी 28 सप्टेंबर रोजी अनंतनाग आणि बड़गाममध्ये दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम राबवली. चकमकीत लश्कर-ए-तोयबाचा कमांडर आसिफ मलिक याच्यासहित 3 दहशतवादी ठार झाले. यादरम्यान 19 राष्ट्रीय रायफलचे जवान हॅप्पी सिंह शहीद झाले होते. 3 जवानांनाही गोळी लागली होती. 

 

 

बातम्या आणखी आहेत...