आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण झालेल्या 3 स्पेशल पोलिस ऑफिसर्सचे मृतदेह सापडले, दहशतवाद्यांनी हत्या केल्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकगदा पोलिसांना लक्ष्य केले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या तीन स्पेशल ऑफसर्सचे मृतदेह शुक्रवारी सकाळी आढलले.  गुरुवारी रात्रीपासून हे तिघे बेपत्ता होते. शोपिया जिल्ह्यात संशयित दहशतवाद्यांनी या 3 पोलिस कर्मचाऱ्यांचे अपहरण केले असल्याची माहिती मिळाली. मात्र नेमके अपहरण कोणी केले होते याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. मात्र आता त्यांचे मृतदेह आढळल्याने परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे. 


अपहरण आणि नंतर हत्या करण्यात आलेले सर्व स्पेशल पोलिस ऑफिसर्स असल्याची माहिती मिळाली आहे. दहशतवाद्यांनी काहि दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्यांना ड्युटीवर न जाता राजीनामा देण्यास सांगितले होते. राजीनामा न दिल्यास परिणाम भोगायला तयार राहण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर गेल्या महिन्यातही काही पोलिस कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले होते. पण नंतर त्यांना सोडण्यात आले. 


दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफ जवानाची निर्घृण हत्या केली होती. पाकिस्तानी सैनिकांनी या जवानाचा गळा कापला होता, त्यानंतर त्याला दोन गोळ्याही घातल्या होत्या. मंगळवारी दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहीदीनने एका व्हिडिओच्या माध्यमातून सुरक्षारक्षकांनी राजीनामा द्यावा अन्यथा होणाऱ्या परिणामांसाठी तयार राहावे अशी धमकी दिली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...