Home | National | Delhi | Terrror Attack in Jummu Kashmir Pulwama: CRPF jawans killed and injured in millitiant attack

Terror Attack : केंद्रीय राखीव दलाच्या बसवर 350 किलो स्फोटके भरलेल्या कारने आत्मघाती हल्ला; 44 शहीद

भास्कर न्यूज  | Update - Feb 15, 2019, 08:30 AM IST

७८ गाड्यांच्या ताफ्यात होते २५४७ आरपीएफ जवान, सुटीहून परतत होते.

 • Terrror Attack in Jummu Kashmir Pulwama: CRPF jawans killed and injured in millitiant attack

  शहिदांना नमन- ४४ भारतीय जवानांचे रक्त सांडल्याने देशाचे रक्त सळसळते आहे. ‘दिव्य मराठी’ या भारतीय भावनेच्या पाठीशी आहे. म्हणूनच या जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्याची ही भावना सर्वोच्च स्थानी ठेवली आहे...


  श्रीनगर- केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या सर्वात मोठ्या अतिरेकी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. जम्मू-श्रीनगर महामार्गावर लेथपोरायेते एका आत्मघाती अतिरेक्याने ३५० किलो स्फोटकाने भरलेली एसयूव्हीने ताफ्यातील एका बसला धडक मारली. स्फोटामुळे दोन बसच्या चिंधड्या झाल्या. या ताफ्यात सीआरपीएफच्या ७८ बसमधून २५४७ जवान होते. यातील बहुतेक जण सुटी संपवून कामावर परतत होते. काश्मिरमध्ये अतिरेक्यांनी १४ वर्षांनतरकार बॉम्बचा वापर केला आहे.

  ग्राउंड झीरोहून...प्रत्यक्षदर्शी जावेद (लेथपोरा, घटनास्थळ)
  - आठ किमीपर्यंत जमीन हादरली, दूरपर्यंत जवानांचे अवयव विखुरले

  लेथपोरा येथील घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर माझे सुकामोवा आणि केशर विक्रीचे दुकान आहे. मी गुरुवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास दुकानात आलो, तेवढ्यात जोरदार स्फोटाचा आवाज ऐकू आला. जमीन हादरली . माझ्या दुकानाच्या खिडकीच्या काचा फुटल्या. भिंतीला तडे गेले. मी घटनास्थळाकडे पळलो. समोर पाहतो तर सीआरपीएफच्या बसच्या चिंधड्या झाल्या होत्या. रस्त्यावर इकडे तिकडे जवानांच्या शरीराचे अवयव विखुरले होते. बसचे तुकडे झाले होते. जवानांच्या शरीराचीही अशीच अवस्था झाली होती. ज्या कारने हा स्फोट घडवला तिचा तर लवलेशही दिसला नाही. इतर जवान सर्व अवयव एकत्र करत होते. काही जवान प्रचंड रागात होते, काही दु:खी होते. मात्र, मी एकही जवान रडताना दिसला नाही. जेथे स्फोटच्या ठिकाणी डिव्हायडरवर तीन फुटांचा खड्डा पडला. आम्ही काही मिनिटे तेथे थांबू शकलो. जवानांनी आम्हाला तेथून दूर जाण्यास सांगितले. माझे परिचित येथून ८ किमी अंतरावर राहतात, तिथपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले. बर्फवृष्टीमुळे काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर महामार्ग बंद होता. सुटीहून परतलेले जवान जम्मूत थांबले. गुरुवारी पहाटे सर्वजण श्रीनगरसाठी रवाना झाले.

  स्थानिक अतिरेक्याचे कृत्य
  हल्लेखोर आदिल अहमद पुलवामाचा होता. २०१८ मध्ये तो अतिरेकी झाला. हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदने त्याचा ९ मिनिटांचा व्हिडिओ जारी केला.

  तयारी : सुरक्षेतील हलगर्जीपणावर प्रश्न
  - गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सीआरपीएफच्या महासंचालकांची बैठक घेतली. पंतप्रधान आज सुरक्षा व्यवस्थेबाबत कॅबिनेट बैठक घेतील.
  - एनएसए डोभाल यांनी रात्री बैठक घेतली. गृह सचिव राजीव गौबा भूतान दौरा अर्धवट सोडून परतले. पुलवामाच्या १५ गावांत नाकेबंदी.
  - हल्ल्याच्या चौकशीसाठी एनआयएची १२ सदस्यांचे पथक नेमले.

  अलर्ट असूनही हलगर्जीपणा का?
  - ताफ्यात नेहमी एक हजार जवान असतात. २५४७ जवानांचा ताफा का पाठवला?
  - सर्वाधिक सुरक्षित महामार्गावर स्फोटकाने भरलेली कार कशी आली?
  - आयईडीद्वारे हल्ला होणार या गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष कसे झाले?
  - गुप्तचर यंत्रणांनी ८ फेब्रुवारी रोजी अलर्ट जारी केला होता की, खोऱ्यात सुरक्षा दलाचा बंदोबस्त किंवा प्रवासात अतिरेकी आयईडीद्वारे हल्ला करतील, सुरक्षा दलाच्या नेमणुकांपूर्वी परिसरातील सुरक्षा तपासणीचा सल्ला दिला होता.

  एक्सपर्ट व्ह्यू...
  -पाकिस्तान-अफगाणिस्तानप्रमाणे हल्ले हा धोक्याचा इशारा, आता प्रत्युत्तराची तयारी

  काश्मीरमधील सर्वात सुरक्षित जम्मू-श्रीनगर महामार्गावर झालेला हा हल्ला आणखी हल्ल्यांचा इशारा आहे. चिंतेची बाब अशी, या हल्ल्याची पद्धत पाकिस्तान व अफगाणिस्तानातील हल्ल्यांप्रमाणेच आहे. काश्मीरात असा हल्ला यापूर्वी २००४ मध्ये झाला होता, तेव्हा अतिरेक्यांनी बारामुल्ला येथे लष्कराच्या बसला लक्ष्य केले होते. अतिरेक्यांनी आयईडीचा वापर १० वर्षांनंतर केला. या बाबींमुळे आगामी काळात स्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताहेत. कारण असे हल्ले पूर्वतयारीनिशी होतात. अफगाणमधील परिस्थिती सुधारल्यानंतर अतिरेकी संघटना तेथे सक्रिय असलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांना काश्मिरात पाठवताहेत. अतिरेक्यांनी या हल्ल्याद्वारे ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपल्या लष्कराने प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे.

  - सय्यद अता हसनैन लेफ्टनंट जनरल (रिटा.)

  मोदींचे टि्वट...
  आमच्या शूर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.उरीतील हल्ल्यानंतर म्हटले होते..या भ्याड हल्ल्यामागे जे कोणी असतील त्यांची गय नाही.

 • Terrror Attack in Jummu Kashmir Pulwama: CRPF jawans killed and injured in millitiant attack
 • Terrror Attack in Jummu Kashmir Pulwama: CRPF jawans killed and injured in millitiant attack

Trending