आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेस्ला कंपनीतील या भारतीयाने सोडले आपले पद, काही मिनिटातच कंपनीला झाले 17 हजार कोटींचे नुकसान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रांसिस्को : टेस्ला कंपनीने चौथ्या तिमाहीमध्ये 9.25 अब्ज रूपयांचा लाभ झाल्याचे नुकतेच घोषित केले होते. कंपनीचे मूळ भारतीय असणारे वित्तीय अधिकारी दीपक आहूजा हे सेवानिवृत्त होत असल्याचे सांगत कंपनीचे संस्थापक आणि सीईओ मस्क यांनी खळबळ निर्माण केली आहे. बुधवारी व्यापार विश्लेषकांसोबत बैठप पार पडली. यामध्ये आहूजा यांची तत्काळ सेवानिवृत्ती होणार आणि ते कंपनीचे वरिष्ठ सल्लागार पदावर कायम राहणार असल्याचे मस्क यांनी सांगितले. मस्क यांनी केलेल्या या घोषणेनंतर टेस्ला कंपनीच्या शेअरमध्ये 4.78 टक्क्यांची घसरण झाली. यामुळे कंपनीच्या बाजार मुल्यात तब्बल 17 हजार कोटी रूपयांनी घट झाली आहे. 


जॅच कर्कहॉर्न घेणार आहूजांची जागा

कंपनीचे सध्याचे वाइस प्रेसिडेंट जॅच कर्कहॉर्न हे आहूजांची जागा घेणार आहेत. आहूजांनी विश्लेषकांना सांगितले की, ''या बदलासाठी ही योग्य वेळ नाहीये. हा एक नवीन अध्याय आहे, नवीन वर्ष आहे. टेस्लाकडे नफा आणि नगदी प्रवाहाचे दोन तिमाही आहेत.'' कंपनीने टेस्लाची मॉडल 3 कारच्या यशस्वीतेनंतर कंपनीचे 1500 अब्ज वार्षिक उत्पन्न झाल्याचे काही दिवसांपूर्वीच सांगितले. आतापर्यंत टेस्लाच्या या मॉडल 3 कारच्या 1 लाख 40 हजार युनिटची विक्री झाली आहे. 


युरोप आणि चीनसाठी मॉडल 3 वाहनांचे उत्पादन सुरु केले. 

वर्ष 2018 मध्ये अमेरिकेतील सर्वाधिक विक्री झालेली कार बनली आहे. यामुळे गेल्या दहावर्षांमध्ये पहिल्यांदाच एक अमेरिकी कार निर्माता कंपनी उच्च स्थानावर पोहोचली आहे. 2019 मध्ये देखील टेस्लाच्या मॉडल 3 कारची विक्री मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे टेस्लाने सांगितले आहे. सोबतच कंपनीने 2018 मध्ये चौथ्या तिमाहीमध्ये उत्तर अमेरिकेत मॉडल 3 गाड्यांचे  63 हजार 359  युनिटची झाली आहे. याशिवाय आम्ही युरोप आणि चीनसाठी मॉडल 3 वाहनांचे उत्पादन सुरु केले आणि आता या बाजारामध्ये विक्री करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे कंपनीने सांगितले. 
 

बातम्या आणखी आहेत...