• Home
  • Tesla's new car will talk to people in the crowd; The company challenged, will give 7 crore rupees more cars to the model 3 hackers

दिव्य मराठी विशेष / गर्दीत लोकांशी बोलेल टेस्लाची नवी कार; कंपनीने दिले आव्हान : मॉडेल -३ ला हॅक करून दाखवणाऱ्यास देणार ७ कोटी अन् कार

  • टेस्लाचे सीईओ अॅलन मस्क यांच्याकडून टि्वटरवर बोलणाऱ्या कारचा व्हिडिओ शेअर
  • ई-कारमध्ये बोलणारे फीचर लवकरच आणणार : मस्क

वृत्तसंस्था

Jan 14,2020 02:27:36 PM IST

सॅन फ्रान्सिस्को - टेस्ला कंपनीचे सीईओ अॅलन मस्क यांनी टि्वटरवर नव्या टेस्ला मॉडेल-३ चा व्हिडिओ दर्शवला आहे. ही कार पायी चालणाऱ्या लोकांशी बोलत असल्याचे दिसते आहे. गर्दीच्या रस्त्यावर ही कार लोकांना बाजूला व्हा, रस्ता सोडा असे सांगतानाही दिसते.

टि्वटमध्ये मस्कने म्हटले, टेस्ला लवकरच लोकांशी बोलेल हे खरे आहे. लवकरच इलेक्ट्रिक कारच्या मॉडेलमध्ये हे दृश्य दिसून येईल. हे फीचर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करेल की ऑडिओ प्लेअरवर ते आधारित असेल हे स्पष्ट झालेले नाही. टेस्लाचे मालक उबेर व ओलाप्रमाणे राइड शेअरिंग सर्व्हिसचा वापर करतात. ते या फीचरचा वापर ग्राहकांना जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी करू शकतात. जगभरात इलेक्ट्रिक कार तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या टेस्लाला आपल्या वाहनांच्या तंत्रज्ञानावर इतका विश्वास आहे की, त्यांनी कारची सुरक्षा यंत्रणा खूप मजबूत असल्याचे म्हटले आहे. कोणाही व्यक्तीने एअायशी संबंधित टेस्ला माॅडेल- ३ ची यंत्रणा हॅक करून दाखवल्यास कंपनी त्याला एक दशलक्ष डॉलर म्हणजे ७.१ कोटी रुपये रोख व ७४ लाख रुपये किमतीची कार भेट देणार आहे.

या कारला व्हँकुव्हरमध्ये याच वर्षी मार्च महिन्यात आयोजित हॅकर्स स्पर्धेत सादर केले जाईल. येथे हॅकर्स आपल्या तांत्रिक व माहितीचा वापर करून ही कार हॅक करण्याचा प्रयत्न करतील. जर एखादा हॅकर यात यशस्वी ठरला तर कंपनीकडून त्याला बक्षीस दिले जाईल. गेल्या वर्षी याच स्पर्धेत हॅकर्सच्या एका ग्रुपने टेस्ला मॉडेल-एसला हॅक करण्यात यश मिळवले होते. त्यानंतर विजेत्या ग्रुपला ३५ हजार डॉलर व एक कार भेट देण्यात आली होती.

टेस्लाने म्हटले : हॅकर्सची स्पर्धा आमच्या उणिवा दाखवते

टेस्लाच्या मते, हॅकर्सची स्पर्धा आमच्यासाठी एक चाचणी आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणेत सुधारणा करण्यास मदत मिळते. या स्पर्धेत हॅकर्सने गेल्या वर्षी टेस्ला मॉडेल -एसला एका ट्रिकने हॅक करून ‘अॅडव्हर्सियल अटॅक’ करून चुकीच्या लेनमध्ये घुसवले होते. मॉडेल एस- टेस्लाची सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे. यात ड्रायव्हरची गरज नसते.

X
COMMENT