आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली कसाेटी १८७७ मध्ये; मात्र पहिल्या जागतिक स्पर्धेचे आयाेजन १४२ वर्षांनंतर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - १८७७ मध्ये कसाेटीने क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांना सुरुवात झाली हाेती. हा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झाला हाेता. मात्र, याच्या मल्टिनेशन्स स्पर्धेला १४२ वर्षांनंतर सुुरुवात झाली. आता कसाेटीच्या वर्ल्डकपचे म्हणजेच टेस्ट चॅम्पियनशिपचे आयाेजन करण्यात आले. याला येत्या १ ऑगस्टपासून सुरुवात हाेत आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठेच्या अॅशेस  मालिकेपासून या चॅम्पियनशिपचा श्रीगणेशा हाेणार आहे. येत्या शुक्रवारपासून हे दाेन्ही संघ इंग्लंडच्या मैदानावर समाेरासमाेर असतील. या टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता संघ २७ कसाेटी मालिकांच्या ७२ सामन्यांतून जून २०२१ मध्ये निश्चित हाेणार आहे. 

 

१९७१ मध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय वनडे सामन्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्याच्या चार वर्षांनंतर वनडेचा विश्वचषक झाला.   झटपट क्रिकेटच्या टी-२० या तिसऱ्या फाॅरमॅटला २००५ मध्ये सुरुवात झाली.  दाेन वर्षांनंतर वर्ल्डकप रंगला हाेता. भारताचा संघ २२ ऑगस्टपासून या चॅम्पियनशिपमधील सलामीचा सामना खेळणार आहे. या सामन्यात भारत आणि विंडीज संघ समाेरासमाेर असतील.  यासाठी भारतीय संघ रवाना झाला आहे.

 

कसाेटीच्या लाेकप्रियतेसाठीची चॅम्पियनशिपची माेहीम
क्रिकेटच्या वनडे आणि त्यानंतर  टी-२० या फाॅरमॅटला अल्पावधीत माेठी लाेकप्रियता िमळाली. याचा चाहता वर्गही झपाट्याने वाढला. त्यामुळे मूळ कसाेटी क्रिकेट मागे पडत गेले. आता कसाेटीतील राेमांचकता वाढवण्यासाठी या चॅम्पिनयशिपच्या आयाेजनाचा निर्णय घेण्यात आला. कसाेटी सामने अधिक आव्हानात्मक आहेत. तसेच सर्वात जुना फाॅरमॅट आहे. यात भारतीय संघाची सध्याची कामगिरी काैतुकास्पद ठरत आहे. त्यामुळे आता संघ विजेतेपदाचा दावेदार मानला जाताे.

 

२०१० मध्येच आयाेजनाचा आराखडा;२०१७ मध्ये निर्णय
कसाेटी चॅम्पियनशिप आयाेजनाचा आराखडा २०१० मध्येच तयार करण्यात आला हाेता. २०१३ आणि २०१७ दरम्यान काही संघांनी याच्या आयाेजनाला विराेध  दर्शवला हाेता. मात्र, २०१७ मध्ये यांच्या अंतिम आराखड्याला मंजुरी मिळाली. त्यामुळे ३१ मार्च २०१८ च्या कसाेटी क्रमवारीनुसार टाॅप-९ संघ या चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरवण्यात आले.  आता आगामी दाेन वर्षांत २७ मालिकांदरम्यान एकूण ७२ कसाेटी सामने हाेणार आहेत.  त्यानंतर विजेता संघ ठरेल. त्यानंतर दुसरी कसाेटी चॅम्पियनशिप जून २०२१ पासून ३० एप्रिल २०२३ पर्यंत खेळवली जाईल. 


सर्वच संघ खेळणार सहा मालिका
स्पर्धेत सहभागी झालेले ९ संघ यादरम्यान सहा देशांच्या विरुद्ध मालिका खेळणार आहेत. चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक संघाला दुसऱ्या संघाविरुद्ध कसाेटी मालिका खेळणे अनिवार्य नाही. प्रत्येक संघ तीन मालिका घरच्या आणि तीन मालिका विदेशात खेळणार आहे. एका मालिकेत दाेन वा त्यापेक्षा अधिक पाच सामन्यांचा समावेश असेल. अशात एक संघ कमी आणि दुसरा संघ अधिक सामने खेळणार आहे. आयसीसीचे एकूण १०५ सदस्य आहेत. मात्र, त्यापैकी अवघ्या ९ स्यायी सदस्य देशांच्या संघांचा या कसाेटी  चॅम्पियनशिपमध्ये समावेश आहे.  त्यामुळेच या ९ संघांना  अव्वल कामगिरी करावी लागेल.

 

प्रत्येक मालिकेसाठी १२० गुण; दाेन सामन्यांच्या मालिकेसाठी अधिक गुण
इतर दाेन संघांच्या द्विपक्षीय मालिकांचाही यात समावेश आहे. यातील प्रत्येक मालिकेतून १२० गुणांची कमाई  करता येईल. दाेन कसाेटी सामन्यांच्या मालिकेसाठी ६० गुण असतील. पाच कसाेटीच्या मालिकेतील प्रत्येक सामन्यासाठी २४ गुण मिळणार आहेत. याच मालिकेतील चार सामने जिंकले आणि एक ड्राॅ  झाला तर विजेत्यांना १४० गुण मिळतील. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक सामन्यातून संघाला गुणांची कमाई करण्याची  माेठी संधी आहे. कारण, यातील प्रत्येक सामन्यासाठी गुण ठेवण्यात आले आहेत.

 

भारतीय संघाचे वेळापत्रक
भारतात   
द आफ्रिकेविरुद्ध पहिली कसाेटी : 2 तेे 6 ऑक्टाेबर, विशाखापट्टणम
> दुसरी कसाेटी : 10 ते 14 ऑक्टाेबर, रांची
> तिसरी कसाेटी : 19 ते 23 ऑक्टाेबर, पुणे


बांगलादेशविरुद्ध पहिली कसाेटी :  14 ते 18 नाेव्हेंबर, इंदूर
> दुसरी कसाेटी : 22 ते 26 नाेव्हेंबर, कोलकाता
> इंग्लंडविरुद्ध 5 मॅचची मालिका : जानेवारी 2021 पासून

 

विदेश दाैऱ्यात 

> वेस्ट इंडीज संघाविरुद्ध  पहिली कसाेटी : 22 ते 26 ऑगस्ट, अँटिगुआ
. दुसरी कसाेटी : 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, जमैका
> न्यूझीलंडविरुद्ध पहिली कसाेटी: 21 ते 25 फेब्रु. 2020, वेलिंग्टन
> दुसरी कसाेटी : 29  फेब्रु. ते 4 मार्च 2020, क्राइस्टचर्च
> ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची  कसाेटी सिरीज :  नाेव्हेंबरपासून

 

द्विपक्षीय मालिकांचेही आयाेजन कायम  
या कसाेटी चॅम्पियनशिपनंतरही दाेन संघांमधील नियमित हाेणाऱ्या टेस्ट सिरीजचे आयाेजन कायम राहणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया- इंग्लंड यांच्यातील अॅशेस, भारत-ऑस्ट्रेलिया  बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीचे आयाेजन कायम राहणार आहे.

 

बक्षीस नाही; लॉर्ड्सवर रंगणार फायनल
चॅम्पियनशिपमध्ये विजेत्या संघाला बक्षिसाच्या स्वरूपात काहीही मिळणार नाही. लाॅर्ड॰सवर या कसाेटी चॅम्पिनयशिपसाठीची फायनल रंगणार आहे. या स्पर्धेत भारतासह इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका, विंडीज, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियन टीमचा समावेश आहे.  झिम्बाब्वे, आयर्लंड व अफगाणला यातून वगळण्यात आले. गुणतालिकेतील टाॅप-२ संघांत फायनल कसाेटी हाेणार आहे. कसाेटी ड्राॅ झाली तर गुणतालिकेतील अव्वलस्थानचा संघ विजेता ठरणार आहे.
 

बातम्या आणखी आहेत...