आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Test Match Is Returning To Pakistan After A Decade, Sri Lankan Team Will Play Two Matches Next Month

एका दशकानंतर पाकिस्तानमध्ये कसोटीचे पुनरागमन, श्रीलंकेचा संघ पुढील महिन्यात दोन सामने खेळणार  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- श्रीलंकेचा क्रिकेट संघ पुढील महिन्यात पाकिस्तानात दोन कसोटी सामन्यांची सीरीज खेळणार आहे. या सीरिजसोबत पाकिस्तानात तब्बल 10 वर्षानंतर कसोटीचे पुनरागमन झाले आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डामध्ये आज याबाबत एकमत झाले. सीरीजचा पहिला सामना रावळपिंडीमध्ये 11 ते 15 डिसेंबरदरम्यान तर दुसरा सामना 19 ते 23 डिसेंबरदरम्यान कराचीमध्ये खेळला जाईल. हे दोन्ही सामना सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहेत.


पीसीबी(पाकिस्तान क्रिकेट बोर्ड)चे डायरेक्टर जाकिर खानने एक म्हटले की, 'पाकिस्तान क्रिकेटसाठी ही खूप चांगली बातमी आहे आणि यावर आमच्या देशाची प्रतिष्ठा जुळली आहे. आता आमचा देशही इतर राष्ट्रांप्रमाणे सुरक्षित असल्याचे दिसेल. आम्ही श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे आभारी आहोत, त्यांनी आपला संघ आमच्या देशात पाठवण्यास सम्मती दिली.' विशेष म्हणजे, पाकिस्तानात शेवटचा कसोटी सामनाही श्रीलंकासोबतच खेळला गेला होता. 2009 मध्ये जेव्हा श्रीलंका पाकिस्तानात आली होती, तेव्हा लाहोरमध्ये त्यांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हापासून पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे बंद झाले.काही दिवसांपूर्वीच झाली होती टी-20 आणि वनडे सीरीज
 
यापूर्वी श्रीलंकाने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानात येऊन वन-डे आणि टी-20 सीरीज खेळली होती. सुरक्षेच्या कारणावरुन श्रीलंकेच्या 10 प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तान येण्यास नकार दिला होता. आता सुरक्षेच्या दृष्टीने सर्व गोष्टी तपासून श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानात येण्सा होणार दर्शवला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...