आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवड्यातील तब्बल ८२२ टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांची नोकरी धोक्यात, औरंगाबादमधील १०० शिक्षकांचा समावेश

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • सेवा समितीचे आदेश देणारे पत्र रद्द करण्याची मागणी

औरंगाबाद- राज्यात १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या आणि ३१ मार्च २०१९ पर्यंत शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) उत्तीर्ण होऊ न शकलेल्या ८ हजार शिक्षकांच्या सेवासमाप्तीची कारवाई प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सुरू केली आहेे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील तब्बल ८२२ शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायदा २००९ मधील कलम २३ नुसार शिक्षकांसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले होते. तसेच ज्यांनी टीईटी उत्तीर्ण केली नाही,पण ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी २०१५ मध्ये मुदतही देण्यात आली होती. त्याला आता चार वर्षे झाली आहेत. परंतु मुदत देवूनही पात्र न ठरलेल्या शिक्षकांसाठी २०२० मध्ये होणारी टीईटी ही अखेरची संधी असू शकते असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.


या संदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला टीईटी उत्तीर्ण होण्याबाबत अतिरिक्त संधी देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार पात्रता नसलेल्या शिक्षकांना तूर्तास सेवेतून काढू नये अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, राज्य शासनाची विनंती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने फेटाळली. यामुळे टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांवर २४ ऑगस्ट २०१८ च्या शासन निर्णयानुसार सेवा समाप्तीची कारवाई करण्याचे आदेश २५ नोव्हेंबरला देण्यात आले होते. त्यानंतर २४ डिसेंबरला म्हणजे महिनाभराने प्रत्यक्ष कारवाईचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आले आहेत.

मराठवड्यात  ८२२ शिक्षकांची नोकरी धोक्या


केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाकडून टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले आहे. यामध्ये मराठवाड्यातील तब्बल १ हजार १२२ शिक्षकांचा समावेश आहे. यामध्ये औरंगाबादमधील १०० शिक्षक हे अल्पसंख्याक शाळेवर आहेत. तर ५० शिक्षक खुल्यावर्गात आहेत. या ५० शिक्षकांचे १ जानेवारीपासूनचे पगार काढू नयेत, असे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत- दिलीप जवुळकर - प्राथमिक विभागाचे वेतन पथक अधिक्षक

सेवा समितीचे आदेश देणारे पत्र रद्द करण्याची मागणी 
 
दरम्यान राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परीषद(एनसीटीई)यांच्या निकषानुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता नसलेल्या शिक्षकांबाबत प्राथमिक शिक्षण संचालकांनी २४ डिसेंबर रोजी निर्गमित केलेले पत्र तात्काळ रद्द करावे, अशी मागणी मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांच्याकडून शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील सुमारे ८ हजार तर मराठवाड्यातील तब्बल ८२२ शिक्षकांना त्यांची नोकरी गमवावी लागणार आहे.यात औरंगाबादमधील १०० शिक्षकांचा समावेश आहे.