आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक ठिकाणी आईने आपल्या बाळाला दुध पाजल्यामुळे व्यवस्थाफकाने केली गैरवर्तवणूक, महापौरांनी महिलेची मागितली माफी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सास(अमेरिका)- येथील एका महिलेला आपल्या 10 महिन्याच्या बाळाला स्तनपान करण्यापासून रोखल्याची घटना घडली आहे. या महिलेचे नाव मिस्टी डुगेरॉक्स (32) असून ती जवळच असलेल्या एका फॅमिली अॅक्वेटिक सेंटरमध्ये पोहण्यासाठी गेली होती. यादरम्यान  तिच्यासोबत तिचे दोन मुलं आणि चार वर्षाचा भाचाही होता. काही वेळाने बाळाला भुक लागल्यामुळे मिस्टी त्याला स्तनपान करू लागली, पण तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि व्यवस्थापकाने तिला स्तनपान करू दिले नाही.

 

त्यावर मिस्टीने त्यांना ती आईच्या कर्तृत्वाचे पालन करित असल्याचे सांगितले असता, सुरक्षारक्षकांनी तिला धक्का दिला. तसेच, व्यवस्थापकांनी नियमांचे कारण देत मिस्टीला तेथून जाण्यास सांगितले. त्यामुळे या सर्व घटनेवर नाराज होऊन मिस्टीने फेसबुकवर एक पोस्ट लिहून आपले दुःख व्यक्त केले. या पोस्टवर लाखों लोकांनी तिचे समर्थन केले आहे. तसेच, शहराचे महापौर 'मॅथ्यू डॉयल' यांनीही या प्रकरणावर माफी मागीतली.

 

स्तनपानामुळे अडचण नव्हतीः पोलिस
मिस्टीने फेसबुकवर लिहिले की, स्तनपान करताना महिलांना अपमानित न करता सन्मान दिला पाहिजे. मला विश्वास आहे की, या पोस्टमुळे समाजात जागरूकता निर्माण होईल. रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनीही मिस्टीला तिथून जायला सांगितले होते.

 

शहराचे पोलिस प्रवक्ता अॅलन बेजर्के यांनी सांगितले की, हे संपूर्ण प्रकरण पोलिसांकडे रेकॉर्ड केलेले आहे. पण मिस्टीच्या स्तनपानामुळे कोणालाच अडचण नव्हती, तर यादरम्यान तिने सर्व सुरक्षा रक्षकांना बाहेर जायला सांगितले होते. 

 

टेक्सासचे महापौर मॅथ्यू डॉयल म्हणाले
कायद्यानुसार, एक आई आपल्या मुलाला कोठेही स्तनपान करू शकते. हा तिचा वैयक्तिक अधिकार असून यासाठी आईला खासगी ठिकाणी जाण्यासाठी सांगता येत नाही. त्यामुळे घडलेल्या या प्रकारावर आम्ही मिस्टीची माफी मागतो.