आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे सरकार आज 10 रुपयांच्या थाळी योजनेस देऊ शकते मंजुरी, जाहीरनाम्यात केली होती घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात दिलेले 10 रुपयांत जेवणाचे वचन पूर्ण करणार आहे. शनिवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता मिळणार असल्याचे मानले जात आहे. भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेने आपला स्वतंत्र जाहीरनामा जाहीर केला होता ज्यामध्ये अनेक आश्वासने देण्यात आली होती.निवडणुकीच्या प्रचारावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले होते की, गरिबांसाठई 10 रुपयांत भोजन थाळीच्या योजनेअंतर्गत एक विशेष कँटींग सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत जेवण मिळेल. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने सरकार स्थापन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता सरकार स्थापनेच्या पंधरवड्यानंतर स्वत:चे हे वचन पूर्ण करणार आहेत.

अशी एक योजना 1995 मध्ये फ्लॉप झाली होती


महत्त्वाचे म्हणजे 1995 मध्ये जेव्हा शिवसेना भाजपप्रणीत सरकार सत्तेत आले तेव्हा शिवसेनेच्या नेतृत्वात सरकारने 1 रुपयात झुणका भाकर योजना सुरू केली. यासाठी शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांना झुणका भाकर केंद्र उघडण्यासाठी जागा देण्यात आली होती. मात्र, नंतर या केंद्रांवर झुणका-भाकरऐवजी चायनीजची विक्री होत होती आणि ही योजना फ्लॉप झाली.