Home | Maharashtra | Mumbai | Thackeray movie music launch in Mumbai udhav Thackeray

बाळासाहेबांच्या जीवनावर आधारीत 'ठाकरे'चे म्युझिक लॉन्च, ‘आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे..’ प्रदर्शित

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 04:57 PM IST

'ठाकरे' हा सिनेमा पक्षाचा प्रचार करण्यासाठी निर्माण केला नसल्याची प्रतिक्रिया खासदार आणि निर्माते संजय राऊत यांनी दिली.

 • Thackeray movie music launch in Mumbai udhav Thackeray

  मुंबई- शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत बहुप्रतिक्षित 'ठाकरे' सिनेमाचे म्युझिक मुंबईत लॉन्च करण्यात आले. यावर 'आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे...' हे हिंदी गीत प्रदर्शित करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब तसेच सिनेमाचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री अमृता राव, निर्माते आणि खासदार संजय राऊत उपस्थित होते.

  मला गाण्यावर ठेका धरावसा वाटला होता, पण- उद्धव ठाकरे
  ‘आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे...’ हे हिंदी गीत ऐकले तेव्हा मला ठेका धरावसा वाटला होता, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. परंतु थोडं भान ठेवावे लागत असल्याचे ते म्हणाले. काही मिनिटातच या गाण्याला यूट्युबवर लोकांची पसंती मिळत आहे. नकाश अजीज याने हे गीत गायये आहे.

  'ठाकरे' शिवसेनेच्या प्रचारासाठी नाही- संजय राऊत
  'ठाकरे' हा सिनेमा पक्षाचा प्रचार करण्यासाठी निर्माण केला नसल्याची प्रतिक्रिया खासदार आणि निर्माते संजय राऊत यांनी दिली.

  दरम्यान, ठाकरे हा सिनेमा येत्या 25 जानेवारी रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये हा सिनेमा येणार आहे. नवाझुद्दीन सिद्दीकी या सिनेमात बाळासाहेबांच्या तर अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. बाळासाहेबांच्या व्यक्तिरेखेला आवाज अभिनेते सचिन खेडेकर यांनी दिला आहे.

 • Thackeray movie music launch in Mumbai udhav Thackeray

Trending