आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'माणसाची ताकद छाती किती इंचाची आहे, त्यावर ठरवत नसतात..\', \'ठाकरे\' सिनेमाचे मराठी-हिंदी ट्रेलर लॉन्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमाचा  ट्रेलर हिंदी आणि मराठी भाषांमध्ये बुधवारी (26 डिसेंबर) वडाळ्यातील कार्निव्हल आयमॅक्समध्ये प्रदर्शित झाला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. 'ठाकरे' हा सिनेमा नसून शिवधनुष्य असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले.

 

बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. बाळासाहेबांची भूमिका साकारणे आव्हानात्मक होते, असे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने यावेळी सांगितले. सर्वात कठीण काम अमृता राव हिने केली आहे. अमृता हिने माँ साहेबांची भूमिका केली आहे.

 

संजय राऊत यांनी सांगितले की, बाळासाहेबांसोबतचा प्रवास रोमांचक होता. सामान्य व्यक्तीला असामान्य बनविण्याचे सामर्थ्य बाळासाहेबांमध्ये होते. त्यांच्यासोबत जे होते तेही आणि जे त्यांच्यासोबत नसत तेही बाळासाहेबांना समजून घेत होते.

 

'ठाकरे' सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे. संजय राऊत यांनी ठाकरे सिनेमाची पटकथा लिहिली असून यासाठी त्यांना चार वर्षे लागली. पुढील वर्षी 23 जानेवारी 2019 रोजी म्हणजेच बाळासाहेबांच्या जयंतीला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. मराठी आणि हिंदी भाषेत हा सिनेमा रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...