आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित \'ठाकरे\' सिनेमा वादाच्या कचाट्यात,\'त्या\' 3 दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित 'ठाकरे' सिनेमा वादाच्या कचाट्यात सापडला आहे, या सिनेमातील दोन संवाद आणि तीन दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. सिनेमाचा ट्रेलर बुधवारी दुपारी दीड वाजता लॉन्च होणार  आहे.

 

सेन्सॉर बोर्ड- शिवसेना आमनेसामने..

सेन्सॉर बोर्डाने आक्षेप नोंदविला असताना सिनेमाचा ट्रेलर ठरल्याप्रमाणे वेळेतच लॉन्च होणार, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. शिवसेनेच्या या भू‍मिकेमुळे आता सेन्सॉर बोर्ड आणि शिवसेना आमनेसामने आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

 

दरम्यान, ‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर बुधवारी (26 डिसेंबर) वडाळ्यातील कार्निव्हल आयमॅक्समध्ये प्रदर्शित होणार आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहाणार आहेत‍.


बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची काही दृश्ये ठाकरे सिनेमात घेण्यात आली आहेत. सेन्सॉर बोर्डाने सिनेमातील भाषेवर आक्षेप घेण्यात आला. दरम्यान, बाळासाहेब अनेकदा आपल्या भाषणात शिवराळ भाषेचा वापर करत होते.

 

वादग्रस्त बाबरी मशिद प्रकरणीही काही दृश्य सिनेमात
वादग्रस्त बाबरी मशिद प्रकरणीही काही दृश्य ठाकरे सिनेमात दाखवण्यात आली आहेत. या दृश्यांमुळे आगामी काळात वाद निर्माण होऊ शकतो. हा वाद निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून म्हणून सेन्सॉर बोर्डाने सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...