Home | Bollywood | Marathi Cinekatta | Thackeray Movie Trailer Launch Photos

PHOTOS : उद्धव ठाकरेंनी केला 'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर लाँच, पत्नीसोबत लावली हजेरी, अमृता-नवाजुद्दीनसह हे मान्यवर होते उपस्थित

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 27, 2018, 12:48 PM IST

पुढील वर्षी 25 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 • Thackeray Movie Trailer Launch Photos

  बॉलिवूड डेस्क: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब ठाकरेंची व्यक्तिरेखा वठवली आहे. तर अभिनेत्री अमृता राव बाळासाहेबांच्या पत्नी मीना ठाकरे यांच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत रिलीज करण्यात येणार आहे. वडाळा येथील आयमॅक्स थिएटरमध्ये बुधवारी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकी, अमृता राव यांच्यासाहित संजय राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह उपस्थित होते. मोठ्या थाटामाटात हा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला.


  खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राऊत यांनीच पटकथा लिहिली असून अभिजीत पानसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पुढील वर्षी 25 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


  पाहुयात, या ट्रेलर लाँच सोहळ्याची क्षणचित्रे...

 • Thackeray Movie Trailer Launch Photos
 • Thackeray Movie Trailer Launch Photos
 • Thackeray Movie Trailer Launch Photos
 • Thackeray Movie Trailer Launch Photos
 • Thackeray Movie Trailer Launch Photos
 • Thackeray Movie Trailer Launch Photos
 • Thackeray Movie Trailer Launch Photos
 • Thackeray Movie Trailer Launch Photos
 • Thackeray Movie Trailer Launch Photos
 • Thackeray Movie Trailer Launch Photos
 • Thackeray Movie Trailer Launch Photos

Trending